जून-2024 अखेरचे मुनष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ई-आर 1 सादर करण्याचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर दि.1 (जिमाका) – सार्वजनिक क्षेत्रातील केंद्र व राज्य शासन यांची सर्व कार्यालये, अंगिकृत उद्योग, व्यवसाय, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका, तसेच खासगी क्षेत्रातील 25 किंवा अधिक लोक काम करतात अशा सर्व आस्थपना, उद्योग, व्यापार, व्यवसाय, कारखाने यांना सेवायोजन कार्यालये (रिक्तपदाची सूचना देणे सक्तीचे) कायदा 1959 व त्या अंतर्गत नियमावली 1960 नुसार त्रैमासिक विवरणपत्र ई-आर 1 माहे जून-2024 तिमाही संपल्यानंतर 30 दिवसाच्या आत (30 जुलै 2024 पर्यंत) सादर करणे बंधनकारक आहे. या प्रमाणे नियोक्त्यांच्या लॉग-इन मध्ये विवरणपत्र www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ऑनलाईन सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे. या प्रमाणे नियोक्त्यांची जून -2024 या तिमाहीचे विवरणपत्र ई-आर-1 दि.30 जुलै 2024 पर्यंत सादर करावे. यासाठी www.rojgar.mahaswayam.gov.in वेबसाईट ओपन करुन एम्प्लॉयर (लीस्ट व जॉब) वर क्लीक करुन एम्प्लोयर लॉग इनमध्ये नियोक्त्यांचा युजर आय डी व पासवर्ड वापरुन लॉग इन करुन ई-आर रिपोर्ट मधील ई-आर 1 ऑप्शनवर क्लीक करुन ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे.यासाठी काही तांत्रिक अडचण आल्यास किंवा अधिकच्या सहाय्यासाठी सोमवार ते शुक्रवार रोजी सार्वजनिक सुट्टया वगळून स. 9.45 ते सायंकाळी 6.15 वा. पर्यंत 0240-2954859 या कार्यालयाच्या दूरध्वनीवर संपर्क करावा.सेवायोजन कार्यालय (रिक्तपदासाठी सूचना देणे सक्तीचे) कायदा 1959 व त्या अंतर्गत नियमावली 1960 मधील तरतुदी नुसार वरील प्रमाण सर्व आस्थपनांनी जून – 2024 या अखेर आपल्या वेतन पदावर असलेल्या सर्व मनुष्यबळाची माहिती ई-आर -1 विवरणपत्र 30 जुलै 2024 पूर्वी वरील वेबसाईटवर ऑनलाईन सादर करणे बंधनकारक आहे. यात कसूर झाल्यास कसूरदार आस्थापनांवर कायदेशिर कारवाई होऊ शकेल. याची नोंद घ्यावी असे सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यांनी कळविले आहे.
00000
Comments
Post a Comment