ग्रा.पं.निवडणुक: जात वैधता प्रमाणपत्र दि.१९ पर्यंत सादर करा
छत्रपती संभाजीनगर दि.१२ (जिमाका)- जिल्ह्यात सन २०२०-२१, सन २०२२ व जून २०२३ या कालावधीत ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक, पोट निवडणूकीत राखीव जागांवर निवडून आलेल्या सर्व संबंधित उमेदवारांना जात वैधता प्रमाण पत्र सादर करण्यासाठी दिलेली मुदत दि.९ रोजी संपुष्टात आली असून त्यांनी आपले वैधता प्रमाणपत्र दि.१९ पर्यंत सादर करावे, असे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी कळविले आहे.
जिल्ह्यात सन २०२०-२१ सन २०२२ व जून २०२३ पर्यंत राज्य निवडणूक
आयोगाचे प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम निहाय
पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक, पोट निवडणूकीत राखीव प्रवर्गातून निवडून
आलेल्या उमेदवारांनी त्या त्या त्या ग्रामपंचयातीचे ग्रामसेवक यांच्याकडे वरील शासन
अध्यादेशानुसार दिलेल्या बारा महिन्याच्या मुदत वाढीच्या कालावधीत जात वैधता समितीकडून
प्राप्त झालेल्या जात वैधता प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत दि.१९जुलै २०२४ रोजी पावेतो
न चूकता सादर करावी. संबंधितांनी जात वैधता प्रमाणपत्राची प्रत सादर न केल्यास महाराष्ट्र
ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १०-१ अ, कलम ३०-१ अ मधील तरतूदीनुसार कार्यवाही करण्यात
येईल, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी स्वामी यांनी कळविले आहे.
Comments
Post a Comment