‘मुख्‍यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’ १ लाख १६ हजार ३७५ बहीणींची नोंदणी पूर्ण

 छत्रपती संभाजीनगर दि.१५ (जिमाका)-‘मुख्यमंत्रीः माझी लाडकी बहीण’ या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी नोंदणीला गती आली आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन्ही पर्याय असल्याने नोंदणी होत आहे,असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुवर्णा जाधव यांनी सांगितले. शनिवार, रविवार या सुटीच्या दिवशीही नोंदणी सुरु होती. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख १६ हजार ३७५ बहीणींची नोंदणी झाली आहे.

            मुख्यमंत्री; माझी लाडकी बहिण या योजनेची नाव नोंदणी सुरु असून ही नोंदणी प्रत्यक्ष गावातच नारी शक्ती दूत या ॲपद्वारे अंगणवाडी सेविका, मदतनीस या करीत आहेत. शनिवार, रविवार सुटी असूनही अंगणवाडी कार्यकर्त्या, कर्मचारी तसेच शहरी भागात वार्ड ऑफिसर, अंगणवाडी सेविका यांचे प्रशिक्षण ही झाले आहे.

जिल्ह्यात एकूण १ लाख १६ हजार ३७५ जणांची नोंदणी झाली आहे. त्यात २६ हजार ३९७  जणींची नोंदणी ही ऑनलाईन तर ८९ हजार ९७८ जणींची नोंदणी ऑफलाईन झाली आहे.  आता पर्यंत ३३०३ जणांना नोंदणी प्रक्रियेबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे. जिल्ह्यात बालविकास प्रकल्प निहाय  झालेली एकूण नोंदणी याप्रमाणे- छत्रपती संभाजीनगर प्रकल्प क्रमांक १- ५६००, छत्रपती संभाजीनगर २-६८०२, गंगापूर १- ११७५१, गंगापूर२- ११६३२, कन्नड-१-९०२४, कन्नड२-९३८२, खुलताबाद-१४१४०, पैठण १-७२४३, पैठण२-८१५०, फुलंब्री-८३३६, सिल्लोड१-७३३१, सिल्लोड२-४०३०, सोयगाव-५१६७, वैजापूर-७७८७ असे एकूण १ लाख १६ हजार ३७५ जणींची नोंदणी झाली आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा