विमानतळ विस्तारीकरणासाठी भुसंपादनाचा कालबद्ध कार्यक्रम राबवावा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 






छत्रपती संभाजीनगर दि.१६ (जिमाका)- चिकलठाणा येथील छत्रपती संभाजीनगर विमानतळ विस्तारीकरणाचे काम वेळेत मार्गी लावण्यासाठी  भूसंपादनाचा कालबद्ध कार्यक्रम राबवावा असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.

            विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. खासदार डॉ. भागवत कराड, अपर जिल्हाधिकारी एम ए डी सी तेजुसिंग पवार,  उपजिल्हाधिकारी भूसंपादन समन्वय प्रभोदय मुळे, विशेष भूसंपादन अधिकारी विश्वनाथ दहे, सहा. संचालक नगररचना, उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड,  विमानतळ प्राधिकरण व्यवस्थापक शरद येवले, सिडको प्रशासक जी.आर. साटोटे, विधी अधिकारी ॲड उषा वायाळ, प्रादेशिक अधिकारी एमआयडीसी चेतन गिरासे, जिल्हा अधीक्षक भुमि अभिलेख डॉ. विजय वीर, कार्यकारी अभियंता अशोक येरेकर, रेल्वेचे जनार्दन बालमुच, महावितरणचे अधीक्षक अभियंता शांतीलाल चौधरी,  अधीक्षक अभियंता एस.एस. भगत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख तसेच स्थानिक शेतकरी आदी उपस्थित होते.

            बैठकीत चर्चा करण्यात आली की, विमानतळ विस्तारीकरणाच्या अनुषंगाने रेल्वे अंडरपासची आवश्यकता नाही,असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले . विआस्तरीकरणाच्या अनुषंगाने महानगरपालिकेमार्फत १५ मीटर रस्त्याच्या भूसंपादनाची कार्यवाही करण्यात यावी. भूसंपादनाची कार्यवाही महाराष्ट्र शासनाने करावी व भूसंपादन अधिकारी विशेष घटक यांनी निधी मागणीचा प्रस्ताव द्यावा. प्रस्तावित भूसंपादन क्षेत्रात येणाऱ्या सिडकोची घरे व अन्य मालमत्तांसंदर्भात शासकीय नियमानुसार कार्यवाही व्हावी. संपादन संस्थेने भूसंपादनासाठी शासन निर्णयानुसार आवश्यक निधी उपलब्ध  करुन द्यावा,असेही बैठकीत ठरविण्यात आले.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा