सैनिकी मुलींचे वसतीगृह येथे माजी सैनिक विधवांसाठी कंत्राटी पदभरती

 छत्रपती संभाजीनगर दि.१९(जिमाका)- जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाअंतर्गत असणाऱ्या सैनिकी मुलींचे वसतीगृह येथे सहाय्यक वसतिगृह अधीक्षक (महिला) हे पद  कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहे. त्यासाठी माजी सैनिक विधवा उमेदवारांनी अर्ज करावयाचा आहे. कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य. इच्छुक उमेदवारांनी वैयक्तिक अर्ज, आधार कार्ड, रहिवासी दाखला, पीपीओ बॅंक पासबुक, डिस्चार्ज बुक इ. सह बुधवार दि.२४ रोजी सकाळी ११ वाजटा जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, नंदनवन  कॉलनी, भावसिंगपुरा रोड, छत्रपती संभाजीनगर येथे उपस्थित रहावे. सैनिक विधवांमधून उमेदवार उपलब्ध न झाल्यास इतर नागरिकांमधून ही पदे भरण्यात येतील,असेही जिल्हास सैनिक कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा