‘मुख्‍यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’ ;जिल्हा महिला बालविकास अधिकारी श्रीमती सुवर्णा जाधव यांची आज आकाशवाणीवर मुलाखत

 


छत्रपती संभाजीनगर दि.१६ (जिमाका)- ‘मुख्यमंत्रीः माझी लाडकी बहीण’ या योजनेबाबत सविस्तर माहित करुन देणारी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीमती सुवर्णा जाधव यांची मुलाखत बुधवार दि.१७ रोजी सकाळी पावणे अकरा वा. आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरुन प्रसारित होणार आहे.

            ‘मुख्यमंत्रीः माझी लाडकी बहीण’ या शासनाच्या महत्त्वकांक्षी योजनेचा लाभ घेण्यासाठी  महिलांना करावयाची नोंदणी, नोंदणी करतांना द्यावयाची आवश्यक  कागदपत्रे, नोंदणीचे ठिकाण  इ. बाबतची सविस्तर माहिती या मुलाखतीत जिल्हा महिला बालविकास अधिकारी श्रीमती सुवर्णा जाधव यांनी दिली आहे. त्यांच्याशी माहिती अधिकारी डॉ. मीरा ढास यांनी बातचीत केली आहे. उद्या बुधवार दि.१७  रोजी सकाळी १० वाजून ४५ मिनिटांनी ‘प्रासंगिक’ या कार्यक्रमात ही मुलाखत प्रसारित होणार आहे. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाच्या वतीने या कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा