जागतिक लोकसंख्या दिन; उत्कृष्ट कार्य करणारे अधिकारी- कर्मचारी सन्मानीत; मुलींचा जन्मदर सुधारणे हेच ‘कुटुंब कल्याणा’चे कार्य- मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना
छत्रपती संभाजीनगर दि.११(जिमाका)- कुटुंब कल्याण कार्यक्रमाच्या कार्यात अधिकारी कर्मचाऱ्यांनी सात्यत ठेवावे. मुलींचा जन्मदरात सुधारणा होण्यासाठी कार्य करणे गरजेचे आहे. कुटुंब कल्याण कार्यक्रमात त्यादिशेने आपले कार्य करावे,असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी आज केले.
जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त कुटुंब कल्याण कार्यक्रमात उत्कृष्ट
कार्य केलेल्या अधिकारी –कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या वेरूळ सभागृहात आयोजित समारंभात
सन्मानित करण्यात आले. त्यावेळी श्री. मीना बोलत होते.
आरोग्य
उपसंचालक डॉ.भूषण रामटेके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभय धानोरकर, जिल्हा शल्य चिकित्सक
डॉ.दयानंद मोतीपवळे, प्रख्यात सर्जन डॉ.अशोक बेलखोडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते कुटुंब कल्याण कार्यक्रमांमध्ये उत्कृष्ट
कार्य केलेल्या जिल्हास्तरीय अधिकारी, सर्जन,
वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, वाहन चालक, आशा स्वयंसेविका, तसेच पीपीआयुसीडी
आणि अंतरा कार्यक्रमांमध्ये उत्कृष्ट कार्य केलेल्या आरोग्य संस्थांना प्रशस्तीपत्रक
व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमात जिल्ह्यातील कुटुंब कल्याण सर्जन
५, उप. जिल्हा रुग्णालय १, ग्रामीण रुग्णालय ३, प्रा.आ.केंद्र ३, आरोग्य सेविका ३, आरोग्य सेवक ३, तसेच पीपीआयसीयुडी
व ‘अंतरा’ अंतर्गत उप. जिल्हा रुग्णालय.१, ग्रा.रु.३, प्रा.आ.केंद्र ३, वैद्यकीय
अधिकारी ३, आरोग्य सहायिका २,आरोग्य सेविका
४,आशा १, प्रोत्साहनपर १५ असे एकूण ७० अधिकारी,
कर्मचारी व आरोग्य संस्थांचा या प्रसंगी प्रमाणपत्र व गौरव चिन्ह देऊन सत्कार करण्यात
आला.
सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कुडलीकर, अतिरिक्त जिल्हा
आरोग्य अधिकारी डॉ.बाळकृष्ण लांजेवार, जिल्हा आरसीएच अधिकारी डॉ.विशाल बेंद्रे,जिल्हा
क्षयरोग अधिकारी डॉ.गणेश कल्याणकर, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.रवींद्र ढोले, सहाय्यक
संचालक डॉ.हलकुडे, जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी श्रीमती सानप, साथरोग वैद्यकीय अधिकारी
डॉ.सारिका लांडगे, साथरोगतज्ञ डॉ.जयश्री लहाने, सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय
अधिकारी, आरोग्य कर्मचारी व आशा उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आरोग्य
सहाय्यक भागिनाथ थोरात, श्रीमती पारिसे, सिनेयंत्रचालक मनोज देशपांडे, श्रीमती नभाबाई
चव्हाण, लतीफ शेख, मोतीलाल लकेकर आदींनी परिश्रम घेतले.सूत्रसंचालन सांख्यिकी अन्वेषक
चंदन गनोरे यांनी केले.
०००००


Comments
Post a Comment