तंबाखुजन्य पदार्थ उत्पादन नियंत्रण कायदा अंमलबजावणीसाठी संयुक्त कारवाई आवश्यक- पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी

 



छत्रपती संभाजीनगर दि.३(जिमाका)- सिगारेट व तंबाखुजन्य पदार्थ उत्पादन कायदा (२००३) जाहिरात मनाई आणि व्यापार व वाणिज्य उत्पादन आणि वितरण या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक पोलीसस्टेशनस्तरावर महिन्यातून एक दिवस संयुक्त कारवाई करण्यात यावी, असे निर्देश पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी दिले.

             सिगारेट व तंबाखुजन्य पदार्थ उत्पादन कायदा (२००३) जाहिरात मनाई आणि व्यापार व वाणिज्य उत्पादन आणि वितरण या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी गठित समितीची आज   पोलीस आयुक्त कार्यालय येथे बैठक घेण्यात आली.

            बैठकीस  वैद्यकीय अधिकारी जितेंद्र डोंगरे, पोलीस उपाधीक्षक (ग्रामीण) प्रकाश चौगुले, सहाय्यक आयुक्त(अन्न व औषध प्रशासन) अजित मैत्रे, वैद्यकीय अधिकारी महानगरपालिका डॉ. सुनील पाटील, माहिती अधिकारी डॉ.मीरा ढास, सामाजिक कार्यकर्त्या डॉ.लक्ष्मी पिसरे आदी समिती सदस्यांची उपस्थिती होती.           

            कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन,पोलीस प्रशासन व आरोग्य विभामार्फत संयुक्त कार्यवाही केली तर तंबाखूजन्य उत्पादनावर नियंत्रण आणण्यासाठी साहाय्य होईल. स्थानीक पोलीस प्रशासनामार्फत कायद्याचे उल्लंघन होत असलेल्या ठिकाणी विशेष कारवाई करण्यात यावी, असे निर्देश स्वामी यांनी दिले.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा