मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना: आस्थापनांनी पदांची मागणी नोंदवावी- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
छत्रपती संभाजीनगर दि.२५(जिमाका)- कौशल्य ,रोजगार , उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबविण्यात येत असून या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होऊन जिल्ह्यातील युवकांना कार्यप्रशिक्षणाचा लाभ व विद्यावेतन मिळावे यासाठी खाजगी उद्योग, व्यवसाय तसेच शासकीय , निमशासकीय विभागांनी आपली प्रशिक्षणार्थ्यांसाठीची मागणी नोंदवावी,असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्ह्यातील
शासकीय, निमशासकीय, महामंडळे, औद्योगिक संघटना, उद्योजक प्रतिनिधी, हॉस्पिटल्स, हॉटेल्स
यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. कौशल्य ,रोजगार , उद्योजकता व नाविन्यता
विभागाचे सहायक आयुक्त सुरेश वराडे यांनी या योजनेविषयी उपस्थित उद्योजकांना व प्रतिनिधींना
माहिती दिली.
जिल्हाधिकारी
स्वामी म्हणाले की, शिक्षण घेतलेल्या युवकांना प्रत्यक्ष कामकाजाचे प्रशिक्षण मिळावे
व त्यासोबत विद्यावेतन मिळावे यासाठी ही योजना असून त्यामुळे प्रशिक्षणार्थी आपल्या
आस्थापनांमध्ये काम करणार असले तरी त्यांचे विद्यावेतन हे शासन देणार आहे. १२ वी उत्तीर्ण
उमेदवारास दरमहा ६ हजार रुपये, आयटीआय वा पदविका उत्तीर्ण उमेदवारास दरमहा ८ हजार रुपये
तर पदवीधर/ [पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या उमेदवारास दरमहा १० हजार रुपये विद्यावेतन ६ महिन्यांच्या कार्यप्रशिक्षण
कालावधीसाठी मिळणार आहे. त्यासाठी आस्थापनांनी कौशल्य
,रोजगार , उद्योजकता व नाविन्यता विभागाकडे आपली पदांची मागणी नोंदवावी. उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर आपली नाव नोंदणी करावी,असे आवाहन त्यांनी
केले. आशिष गद्रे यांची यावेळी उपस्थिती होती.प्रास्ताविक सुरेश वराडे यांनी केले.
जिल्ह्यातील उद्योजक, उद्योग संघटनांचे प्रतिनिधी , शासकीय विभागांचे प्रमुख आदी यावेळी
उपस्थित होते.
०००००
Comments
Post a Comment