अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तूची साठेबाजी आढळल्यास तक्रार नोंदवा-जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी

 


छत्रपती संभाजीनगर दि.१(जिमाका)- जिल्ह्यामध्ये जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा  व साठेबाजीमुळेवर  होणाऱ्या भाववाढीवर नियंत्रण आणण्यासाठी ग्राहक संरक्षण समिती, व भाववाढ नियंत्रण समिती गठीत करण्यात आली आहे.  जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, घरगुती  गॅस सिलेंडर इ. साठेबाजी करून कृत्रिम भाववाढ होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याबाबत नागरिकांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे नोंदवावी असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी केले आहे.

            ग्राहकांना जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा सुरळीत व्हावा व भाव वाढीवर नियंत्रण राहून योग्य दरामध्ये ग्राहकांना जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा होण्यासाठी संनियत्रण केले जाते.आवश्यकतेनुसार प्रशासनाकडून कारवाई करण्यात येते.  कोणत्याही व्यापाऱ्याने जीवनावश्यक वस्तूचा अतिरिक्त साठा केला असल्याचे आढळल्यास नागरिकांनी तसेच सामजिक संघटना प्रतिनिधी, समितीचे अशासकीय सदस्य यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे तक्रार नोंदवणे आवश्यक आहे. केलेल्या तक्रारीची दखल घेऊन  तात्काळ कारवाई करण्यात येईल असेही स्प्ष्ट करण्यात आले . यासंदर्भात आज झालेल्या बैठकीस भारतीय अन्न महामंडळाचे प्रबंधक वाणिज्य शाखा चे  राहुल कुलकर्णी, जिल्हा निबंधक सहकारी संस्था कार्यालयाच्या अधीक्षक सुषमा साबळे यांच्यासह समितीतील अशासकीय सदस्य  उपस्थित होते.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा