नागरिकांनो वृक्ष लागवडीसाठी पुढाकार घ्या-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
छत्रपती संभाजीनगर दि.१(जिमाका)- जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात वृक्षरोपणासाठी रोप विक्री केंद्र स्थापन करण्यात आले असून जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या नागरिक,अधिकारी कर्मचारी यांनी रोपांची खरेदी करून वृक्ष लागवड कार्यक्रमात सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज केले.
जिल्हाधिकारी
कार्यालयाच्या प्रांगणात ‘अमृत वृक्ष आपल्या दारी’ आणि ‘एक पेड मा के नाम’ या उपक्रमाअंतर्गत
जिल्हाभरात वृक्ष लागवड करण्यात येणार असून वृक्ष रोपे उपलब्ध व्हावे यासाठी जिल्ह्यातील
महत्त्वाच्या, वर्दळ असणाऱ्या ठिकाणी रोप विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
त्यातील जिल्हाधिकारी कार्यालयातील रोप विक्री केंद्राचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते
उद्घाटन करण्यात आले. विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण विभागाच्या कीर्ती जमदाडे,उपजिल्हा
निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, प्रादेशिक चौकशी अधिकारी अजित खंदारे, नायब तहसिलदार
रेवणनाथ ताठे यांच्यासह सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती
होती.
या रोप विक्री केंद्रावर नऊ महिने कालावधीचे रोप
११ रुपये, १८ महिन्यावरील रोप २६रुपये या सवलतीच्या दरात उपलब्ध असून हा दर दि.३० सप्टेंबर
पर्यंत आकारला जाणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील रोप विक्री केंद्र दि.१५ ऑगस्ट पर्यंत सुरु राहणार आहे.
नागरिकांनी रोपांची खरेदी करून वृक्ष लागवडीत व संगोपनात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे
आवाहन जिल्हाधिकारी स्वामी यांनी केले.
००००००
Comments
Post a Comment