महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कासाठी अर्ज करण्यास दि.२ ऑगस्ट पर्यंत मुदवाढ
छत्रपती संभाजीनगर दि.१८(जिमाका)- वीरशैव-लिंगायत समाजाचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकास होण्यासाठी कलात्मक, समाजप्रबोधन साहित्यीक क्षेत्रात कार्य करणाऱ्या कलावंत साहित्यीक, समाज प्रबोधनकार आणि समाज सेवकांना तसेच समाजासाठी कार्य करणाऱ्या संस्थांना प्रतिवर्षी वैशाख शुद्ध (अक्षय तृतीया) या दिवशी एक व्यक्ती व एक संस्था यांना महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार देण्यात येतो. त्यासाठी अर्ज करण्यास शुक्रवार दि.२ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे इतर मागास बहुजन कल्याण सहाय्यक संचालक पी.जी.वाबळे यांनी कळविले आहे.
महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार सन २०२३-२४ या वर्षासाठी
करावयाच्या अर्जाचा नमुना सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, खोकडपुरा
या कार्यालयात उपलब्ध असून विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह दि.२ ऑगस्ट
पर्यंत सादर करावा. यापूर्वी अर्ज सादर केलेल्या व्यक्ती व संस्था यांनी पुन्हा अर्ज
सादर करण्याची आवश्यकता नाही,असेही कळविण्यात आले आहे.
०००००
Comments
Post a Comment