साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजना; अर्ज करण्याचे आवाहन

 छत्रपती संभाजीनगर दि.१६(जिमाका)- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या) जिल्हा कार्यालय मार्फत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते, या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक पात्र लाभार्थ्यांनी अर्ज करावा असे आवाहन  जिल्हा व्यवस्थापक किसन भि.पवार यांनी केले आहे.

            साहित्यरत्न शाहिर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेसाठी मातंग समाज व तत्सम १२ पोट जातीतील सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात १०वी १२ वी, पदवी, पदव्यूत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी इ. अभ्यासक्रमामध्ये विशेष प्राविण्याने गुणवत्ता मिळवून ६० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त झालेल्या विद्यार्थी,विद्यार्थीनीकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या शिष्यवृत्तीचे वितरण करण्यासाठी जास्त टक्केवारी प्राप्‍त केलेल्या विद्यार्थ्यांची गुणाक्रमानुसार निवड मुख्यालय मुंबई यांच्याकडून उपलब्ध निधीच्या प्रमाणात केली जाते,याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

अर्जासोबत पुढीलप्रमाणे दिलेल्या कागदपत्रे दोन प्रतीत जोडणे आवश्यक आहे.

१. अर्जदाराचा जातीचा दाखला : सक्षम अधिकारी यांच्याकडून घेतलेला असावा.

२.आधार कार्ड, रेशन कार्ड

३.गुणपत्रक (मार्कशिट)

४. पासपोर्ट साईज फोटो

५. बोनाफाईड, पुढील वर्गामध्ये प्रवेश घेतल्याचा पुरावा

पूर्ण भरलेले अर्ज अर्जदाराने जिल्हा कार्यालय, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या) डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन मजला, बिल्डिंग शिवाजी हायस्कूलच्या बाजूला, खोकडपूरा, येथे दि.२५ पर्यंत जमा करावे, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक किसन भि.पवार यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा