अल्पसंख्याक मुलींसाठी वसतीगृह; प्रवेशासाठी अर्ज मागविले
छत्रपती संभाजीनगर दि.९(जिमाका)- शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी छत्रपती संभाजीनगर येथे शासकीय विज्ञान संस्था परिसरात अल्पसंख्यांक मुलींसाठी वसतीगृह आहे. शासकीय विज्ञान संस्था परिसर, निपट निरंजन नगर, लेणी मार्ग, बिबी का मकबरा मागे असा या वसतीगृहाचा पत्ता आहे. त्याची प्रवेश क्षमता १०० असून फक्त शासकीय अनुदानित वा विनाअनुदानित महाविद्यालयांतील विद्यार्थिनींना प्रवेश देण्यात येतो. अल्पसंख्याक प्रवर्गातील विद्यार्थिनींना ७० जागा आहेत- त्यात मुस्लिम, ३५, बौद्ध-२१, ख्रिश्चन-६, जैन-६ , शिख व पारशी प्रत्येकी या प्रमाणे जागा राखीव आहेत. इतर प्रवर्गातील विद्यार्थिनींकडून उर्वरित जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. ज्या अल्पसंख्याक मुलींच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांच्या आत असेल त्यांना वसतिगृह प्रवेश निशुल्क असेल. अधिक माहितीसाठी www.minoritygirlshostel.in या संकेतस्थळावर किंवा शासकीय विज्ञान संस्थेच्या http://www.gisa.ac.in या संकेतस्थळावरुन अर्ज डाऊन लोड करुन भरु शकता असे संचालक शासकीय विज्ञान संस्था, अल्पसंख़्याक मुलींचे वसतीगृह, छत्रपती संभाजीनगर यांनी कळविले आहे.
०००००
Comments
Post a Comment