संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.1 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

 छत्रपती संभाजीनगर दि.7 (जिमाका) –संघ लोकसेवा आयोगा मार्फत राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा – II रविवार दि.1 सप्टेंबर रोजी होणार आहे. ही परीक्षा सत्र –I सकाळी 10 ते 12.30 वाजेपर्यंत व सत्र – II दुपारी 14 ते 16.30 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. तसेच सीडीएस – II परीक्षा -2024 परीक्षा – I सकाळी 9 ते 11 सत्र – II  12 ते 2 व सत्र –III दुपारी 3 ते 5 या कालावधीत सदरील परीक्षेचे आयोजन करण्यात आलेले आहे एकूण 15 परीक्षा उपकेंद्रावर परीक्षा संपन्न होणार असून परीक्षेसाठी एकूण 4 हजार 553 उमेदवारांना आयोगाकडून प्रवेश देण्यात आलेला आहे,अशी माहिती उपजिल्हाधिकारी(सामान्य प्रशासन) प्रभोदय मुळे यांनी दिली आहे.

परीक्षा केंद्रांची यादी व कंसात परीक्षार्थींची संख्या याप्रमाणे-

1.    मौलाना आझाद कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (सायसन्स बिल्डिंग भाग- अ) रोजा बाग, हर्सुल रोड, (277)

2.    मौलाना आझाद कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय(टॉम पॅट्रीक बिल्डींग पार्ट - ब) रोजा बाग, हर्सुल रोड, (435)

3. शासकीय विद्यालय कला व विज्ञान महाविद्यालय,शासकीय सुभेदारी विश्रामगृहाजवळ (384)

4. डॉ.रफिक झकेरिया कॉलेज फॉर वुमन नवखंडा ज्युबली पार्क (384)

5. सरस्वती भुवन मुलाची शाळा, औरंगपुरा (384)

6. सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालय, औरंगपुरा (288)

7. विवेकानंद कला व सरदार दिलीपसिंग वाणिज्य महाविद्यालय, समर्थ नगर (288)

8. विवेकानंद विज्ञान महाविद्यालय, समर्थ नगर (288)

9. महिला मंडळ संचलित शिशु विहार हायस्कूल, बलवंत वाचनालय जवळ औरंगपुरा (288)

10. मिलिंद महाविद्यालय नागसेनवन (288)

11. हॉली क्रॉस मराठी हायस्कूल लक्ष्मी कॉलनी छावणी परिसर (288)

12. मिलिंद कला महाविद्यालय (288)

13. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (288)

14. शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय (277)

15. केंद्रीय विद्यालय, नगर नाका जवळ छावणी परिसर (108)

परीक्षार्थिंसाठी सुचनाः-

1.     परीक्षेस येतांना उमेदवारांने ओळखीच्या पुराव्यासाठी स्वत:चे आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड किंवा स्मार्ट कार्ड प्रकाराचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे.

2.    परीक्षेच्या वेळी कक्षात प्रवेशप्रमाणपत्र काळ्या व निळ्या शाईचे बॉल पाँईट पेन, ओळखपत्र   

व ओळखपत्राची छायांकीत प्रत या व्यतिरिक्त अन्य कोणतेही साहित्य अथवा वस्तू घेऊन  जाण्यास उमेदवारास परवानगी असणार नाही.

 3.    उमेदवारास त्याच्या सोबत डिजीटल डायरी, मायक्रोफोन, मोबाईल, ब्लुटूथ, कॅमेरा किंवा

    तत्सम कोणतेही संदेशवहन उपकरण, कोणतेही इलेक्ट्रॉनिक साहित्य परीक्षाकक्षामध्ये घेऊन

   जाण्यास सक्त मनाई आहे. असे साहित्य आणले तर उमेदवारांना स्वत:च्या जबाबदारीवर

   परीक्षा केंद्रांच्या आवाराच्या मुख्य दरवाजाबाहेरच ठेवावे लागेल. तसेच असे साहित्य

   ठेवण्याची जबाबदारी आयोगाची असणार नाही. परीक्षा केंद्राच्या आवाराच्या मुख्य

   दरवाजाच्या आत असे साहित्य आणल्यास उमेदवारांवर फौजदारी व प्रशासकीय कारवाईसह   

   त्यांना आयोगाच्या आगामी परीक्षाकरीता बंदी घालण्यात येईल.

4.    परीक्षा कक्षात शेवटच्या प्रवेशासाठी निर्धारीत केलेल्या वेळेनंतर आलेल्या उमेदवारास कोणत्याही परिस्थितीत परीक्षेसाठी प्रवेश देण्यात येणार नाही. याची दक्षता घेण्यात यावी. कोणत्याही कारणास्तव अशा उमेदवारास प्रवेश देण्याचे प्राधिकार आयोगाच्या परस्पर कोणत्याही व्यक्तींना प्रदान करण्यात आलेले नाहीत.

5.    प्रत्यक्ष परीक्षा सुरु झाल्यांनतर परीक्षा उपकेंद्राचे प्रवेशद्वार बंद करुन घेण्यात यावे.

6.   परीक्षेच्या पर्यवेक्षणाकरीता आयोगाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

7.    परीक्षेच्या पर्यवेक्षणाकरीता जिल्हाधिकारी स्वत: पर्यवेक्षणावर लक्ष ठेवणार आहेत.

00000 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा