अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या कर्ज योजनेची लाभर्थी सोडत 5 सप्टेंबरला
छत्रपती
संभाजीनगर दि.28 (जिमाका) – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ
(मर्या.) जिल्हा कार्यालयास सन 2023 – 24 या आर्थिक वर्षाकरीता प्रकल्प मर्यादा
पाच लाख असलेली सुविधा कर्ज योजनेतंर्गत 75 चे भौतिक उद्दिष्ट व रुपये एक लाख
चाळीस हजार प्रकल्प मर्यादा असलेल्या महिला समृद्धी योजनेतं र्गत 50 चे उद्दिष्ट प्राप्त झालेले आहे.
अपर जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष लाभार्थी निवड समिती
यांच्या अध्यक्षतेखाली दि.12 फेब्रुवारी 2024 ते 20 मार्च 2024 या कालावधीत कर्ज
मागणी अर्ज स्विकारण्यात आलेले आहे.
महिला समृद्धी योजनेतंर्गत 157 कर्ज प्रकरणे प्राप्त
झालेले असून त्यापैंकी 110 पात्र व 47 अपात्र असून दि.24 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11
वा. अपर जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष लाभार्थी निवड समिती, यांच्या अध्यक्षतेखाली
झालेल्या बैठकीत योजना निहाय प्राप्त कर्ज प्रकरणास मान्यता देण्यात आली आहे.
सुविधा कर्ज व महिला समृद्धी योजनेतंर्गत पात्र
असलेल्या अर्जदारापैंकी अनुक्रमे 75 व 50 लाभार्थीची निवड निवासी उपजिल्हाधिकारी व
सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालय यांच्या हस्ते दि.5 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 12
वा. डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शिवाजी हायस्कूलच्या बाजुला खोकडपुरा
या ठिकाणी होणार आहे. असे जिल्हा व्यवस्थापरक के.बी. पवार यांनी
प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
00000
Comments
Post a Comment