मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरु
छत्रपती संभाजीनगर दि.६ (जिमाका)- अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजाभज, इमाव , आर्थिक मागास प्रवर्गातील व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. https://hmas.mahait.org या वेबपोर्टलद्वारे ऑनलाईन अर्ज भरणे प्रक्रिया सुरु आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ३१ जुलै पूर्वी ऑफलाईन अर्ज भरले असतील त्यांनी देखील ऑनलाईन अर्ज पोर्टलद्वारे भरणे आवश्यक आहे. दि.३१ ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन अर्ज भरुन अर्जाची प्रिंट १००० मुलांचे शासकीय वसतीगृह, किलेअर्क, छत्रपती संभाजिनगर येथे व विद्यार्थिनींनी आपले अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, खोकडपुरा, छत्रपती संभाजीनगर येथे सादर करावे,असे आवाहन सहाय्यक आयुक्त पी.जी. वाबळे यांनी केले आहे.
०००००
Comments
Post a Comment