सौर उर्जा यंत्रणा उभारणी प्रशिक्षण दि.१९ पासून

 छत्रपती संभाजीनगर दि.८ (जिमाका)-  महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ (MSSIDC) मुंबई व  महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) छ.संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने रेझिंग ॲण्ड असेलेरेटिंग एम.एस.एम.ई.परफॉरमन्स (RAMP) या प्रकल्पाअंतर्गत सौर उर्जा यंत्रणा उभारणीसाठी मोफत पाच दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन दि.१९ पासून करण्यात आले आहे.

या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश, सोलर क्षेत्रात स्किल अपग्रेडेशन,रीस्कीलिंग,तसेच महाराष्ट्र शासनाच्या सौर उर्जा वर आधारित प्रकल्पांना ला चालना देणे, राज्यात वीज निर्मिती क्षेत्रात उद्योगाच्या/रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात आणि आर्थिक विकासाला चालना मिळावी हा आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमात तांत्रिक अभ्यासक्रमामध्ये सौर उर्जा क्षेत्राचा परिचय, दिशा आणि कोन, ऑन ग्रिड, ऑफ ग्रिड आणि हायब्रिड सिस्टमचे तपशील, लोड आणि कोटेशन्सची गणना कशी करायची, साइट सर्वेक्षण, साइट निवड,सोलर प्लांट इंस्टॉलेशन, सोलर पीव्ही ऑपरेशन, मेंटेनन्स, कमिशनिंग,ट्रबलशूटिंग आणि मॉड्यूल आउटपुटवर परिणाम करणारे घटक तसेच उद्योजकीय मार्गदर्शनामध्ये शासकीय कर्ज योजनांची माहिती , सौर उर्जा क्षेत्रात उद्योगाच्या वेगवेगळ्या संधी.प्रकल्प अहवाल ,मार्केटिंग कौशल्य,इत्यादी विषयांवर सविस्तर मार्गदर्शन तज्ज्ञाचे वतीने करण्यात येणार आहे.  इच्छुक नवउद्योजक, उद्योजक व इतर संबंधितांनी अधिक माहितीकरिता महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, (एमसीईडी) अ-३८, एमआयडीसी रेल्वे स्टेशन एरिया, देवगिरी कॉलेज जवळ छत्रपती संभाजीनगर येथे कार्यक्रम समन्वयक प्रवीण ठोके- 8830224979 किंवा प्रकल्प अधिकारी भारती सोसे- 9403683173 येथे दि.१६ ऑगस्ट पर्यंत संपर्क करावा असे आवाहन विभागीय अधिकारी डी.यू.थावरे यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा