विशेष लेखः मुख्यमंत्रीःतीर्थ दर्शन योजना

भारत देशात विविध पथांचे अनुयायी व वास्तव्यास आहे. तसेच महाराष्ट्र ही संताची भूमी म्हणून ओळखली जात असुन महाराष्ट्रात सर्वाधिक संत तसेच धर्मगुरु होऊ गेले आहे. महाराष्ट्राला वारकरी सप्रंदायाची, भक्तीमार्गाची परंपरा आहे. ज्येष्ठ नागरिक यांना देशातील मोठ्या तीर्थस्थळांना जाऊन अध्यात्मिक पातळी गाठणे सुकर व्हावे यासाठी राज्यातील सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिकांना ज्याचे वय ६० वर्ष किंवा त्याहुन अधिक आहे. त्यांना राज्य आणि भारतातील तीर्थस्थळांना मोफत भेटीची, दर्शनाची संधी देण्यासाठी मुख्यमंत्रीः तीर्थदर्शन योजना सुरु करण्यात आली आहे.

पात्रतेचे निकषः-

१.      वयोमर्यादा ६० वर्षे व त्या वरील ज्येष्ठ नागरिक

२.      महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक

३.      वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.

आवश्यक कागदपत्रे

१.      अर्जदाराचे आधार कार्ड, रेशन कार्ड (स्वंय सांक्षाकित प्रत)

२.      महाराष्ट्रराज्याचे रहिवाशी असल्याबाबत अर्जदाराचे अधिवास प्रमाण पत्र, महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला, अर्जदाराचे १५वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाण पत्र (यापैकी कोणतेही एक)

३.      सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंबप्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपर्यंत असणे अनिवार्य) किंवा अंत्योदय अन्ना योजना (AAY)  किंवा प्राधान्य कुटुंब योजना (PHH) किंवा वार्षिक उत्पन्न अडीच लक्ष रुपयांच्या आत असलेले मात्र प्राधान्य कुटुंब नसलेल्या (NPH) शिधापत्रिकाधारक (यापैकी कोणतेही एक)

४.    शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेला शारिरीकदृष्ट्या निरोगी आणि प्रस्तावित प्रवासासाठी सक्षम असल्याचे अर्जदाराचे मूळ वैद्यकीय प्रमाणपत्र.

लाभ घेण्यासाठी आपले अर्ज हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शिवाजी हायस्कूल जवळ, खोकडपुरा, छत्रपती संभाजीनगर येथे जमा करावे,असे आवाहन सहाय्यक आयुक्त पी.जी. वाबळे यांनी केले आहे.

माहिती संकलनः जिल्हा माहिती कार्यालय, छत्रपती संभाजीनगर

००००० 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा