साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ; इच्छुकांकडून कर्ज प्रस्ताव मागविले
छत्रपती संभाजीनगर दि.27 (जिमाका) – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या) छत्रपती संभाजीनगर विषेष केंद्रीय अर्थसहाय्यक योजना आणि बीजभांडवल योजना या योजनांचे कर्ज प्रस्ताव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मातंग समाजातील इच्छुक अर्जदाराकडून मागविण्यात येत आहे. विशेष केंद्रिय अर्थसहाय्य योजनेसाठी 150 उद्दिष्ट आहे आणि बीजभांडवल योजनेसाठी 50 उद्दिष्ट आहे.
तसेच छत्रपती
संभाजीनगर जिल्ह्यातील मांग, मातंग समाजातील इच्छुक अर्जदाराचे वय 18 वर्ष पुर्ण असावे
व 50 वर्षापेक्षा जास्त नसावे. शहरी व ग्रामीण अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न
मर्यादा रु.तीन लाखापेक्षा जास्त नसावी तसेच अर्जदाराने महामंडळाच्या कुठल्याही योजनेचा
लाभ घेतलेला नसावा तसेच अर्जदाराने महामंडळाच्या नियमाप्रमाणे आवश्यक त्या कागदपत्रांची
पुर्तता करून कर्ज प्रस्ताव दोन प्रतीत खालील 'ठिकाणी स्वतः अर्जदाराने मुळ कागदपत्रांसह
उपस्थित राहून दाखल करावे. त्रयस्थ व मध्यस्थामार्फत
कर्ज प्रकरणे स्विकारण्यात येणार नाही.
कर्ज प्रस्तावासोबत आवश्यक कागदपत्रे
जातीचा दाखला,
उत्पन्न प्रमाणपत्र, रेशन कार्ड (समोरचे पान
व शेवटचे पान), मतदान कार्ड,आधार कार्ड (समोरील
बाजु व पाठीमागील बाजु), पॅन कार्ड, दोन पासपोर्ट
साईज फोटो, व्यवसायाचे दरपत्रक (कोटेशन), व्यवसाय
ज्या ठिकाणी करावयाचा आहे त्या ठिकाणची भाडेपावती, भाडे करारनामा किंवा मालकी हक्काचा
पुरावा (नमुना नं. 8, लाईट बील व टॅक्स पावतीसह प्रतिज्ञापत्र बॉन्डवर नोटरी सह), बीजभांडवल
योजनेसाठी प्रकल्प अहवाल, ग्रामपंचायत/ नगरपालिका/
महानगरपालिका यांचे ना हरकत प्रमाणपत्र किंवा शॉपॲक्ट, उद्यम आधार परवाना, वाहनासठी
लायसन्स,परवाने बॅचची आवश्यकता आहे. व्यवसाया संबंधित तांत्रिक प्रमाणपत्र, तसेच अनुभवाचा
दाखला, शैक्षणिक दाखले इत्यादी कर्ज मागणी प्रकरणा सोबतची सर्व कागदपत्रे स्वत:च्या
स्वाक्षरीने साक्षांकित करावीत. सदर योजनेचे
सर्व कर्ज प्रस्ताव महामंडळाच्या विहीत नमुन्यातील वाटप व प्राप्त अर्ज दि.09 सप्टेंबर
ते 30 सप्टेंबर 2024 पर्यंत कार्यालयीन वेळेत सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे
विकास महामंडळ मर्या., जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,
शिवाजी हायस्कुलच्या बाजुला, खोकडपुरा, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी कर्ज मागणी अर्ज
वाटप व स्विकारले जातील (एक अर्जदारास एकच कर्ज मागणी अर्ज देण्यात येईल).
कर्ज मागणी
अर्ज विनामुल्य कार्यालयात उपलब्ध असून, विशेष केंद्रीय अर्थसहाय्य (अनुदान) व बीजभांडवल
योजने अंतर्गत जिल्हा कार्यालयाकडे यापुर्वी दाखल केलेले व बँकेकडून नामंजुर होऊन परत
आलेले सर्व जुने कर्ज प्रकरणे रद्द समजण्यात यावेत, उद्दिष्टापेक्षा जास्तीचे कर्ज
प्रकरणे प्राप्त झाल्यास शासन निर्णय नुसार लाभार्थीचे निवड लॉटरी पध्दतीने केली जाईल.
उपरोक्त दोन्हीही योजनेअंतर्गत पात्र झालेल्या लाभार्थीचे कर्ज प्रकरण जिल्हा लाभार्थी
निवड समितीच्या मान्यतेने संबंधीत शाखेकडे मंजुरीसाठी शिफारस करण्यात येतील. इच्छिुकांनी
अर्ज करण्याचे आवाहन सा.लो.अ.सा.वि.म.(म) तथा सदस्य सचिवला.नि.स.छत्रपती संभाजीनगर
जिल्हा व्यवस्थापक के.बी. पवार यांनी कळविले आहे.
00000
Comments
Post a Comment