विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी/ विधवा/ पाल्य यांचा होणार गौरव
छत्रपती संभाजीनगर दि.१३ (जिमाका)- माजी सैनिक त्यांच्या पत्नी, विधवा आणि पाल्य यांनी विविध क्षेत्रात कार्य केले असल्यास त्यांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय विशेष पुरस्कार देण्यात येतो. त्यासाठी संचालक, सैनिक कल्याण विभाग पुणे यांचेकडे दि.३० सप्टेंबर पर्यंत नावे कळवावयाची आहेत. तरी पात्रता धारकांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे संपर्क साधावा.
पुरस्कारासाठी ग्राह्य धरलेल्या
बाबींमध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळातील पुरस्कार प्राप्त खेळाडू,
साहित्य, संगित, गायन, वादन, नृत्य इ. क्षेत्रातील पुरस्कार विजेते, यशस्वी
उद्योजक पुरस्कार विजेते, नैसर्गिक आपत्तीत बहुमोल कामगिरी बजावणारे इ. बाबींचा
समावेश आहे. तसेच इयत्ता १० वी, १२ वी बोर्डाच्या परीक्षेत ९० टक्क्यांपेक्षा जादा
गुण मिळविलेल्या माजी सैनिक पाल्यांनाही विशेष पुरस्कार दिला जातो, त्यासाठी सर्व
कागदपत्रांसह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, नंदनवर कॉलनी, छत्रपती संभाजीनगर येथे
बुधवार दि.२५ सप्टेंबर रोजी सायं.४ वाजेपर्यंत आपले प्रस्ताव सादर करावे. अधिक
माहितीसाठी ०२४०-२३७०३१३ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात
आले आहे.
०००००
Comments
Post a Comment