सार्वजनिक उत्सवाकरीता वर्गणी जमा करण्यासाठी परवानगी आवश्यक

             छत्रपती संभाजीनगर दि.१५(जिमाका)- महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम१९५० चे कलम ४१(क) अन्वये धर्मादाय सह आयुक्त तथा सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाकडून सार्वजनिक उत्सवा करीता वर्गणी जमा करण्यासाठी परवानगी दिल्या जातात. या पार्श्वभुमिवर आगामी कालावधीत होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंडळांनी प्रवानगी शिवाय वर्गणी जमा करु नये. नागरिकांनीही वर्गणी देतांना मंडळ हे नोंदणीकृत आहे किंवा नाही? याबाबत खातरजमा करुनच वर्गणी द्यावी. परवानी साठी मंडळांनी आपल्या मंडळाचा अर्ज धर्मादाय विभागाचे संकेतस्थळ charity.mahaashtra.gov.in वर Event Registration या सदराखाली कलम ४१(क) अंतर्गत लवकरात लवकर दाखल करावा. या संकेतस्थळावर  ऑनलाईन परवानगी मिळण्याची तरतूद आहे. ज्यांना ऑनलाईन नोंदणी शक्य नाही त्यांनी धर्मादाय सहआयुक्त तथा सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, बाबा पेट्रोल पंपाच्या बाजुला अदालत रोड, छत्रपती संभाजीनगर येथे कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत अर्ज करावा,असे आवाहन  सहायक धर्मादाय आयुक्त  वि.दे. शेंडे यांनी केले आहे. अर्जा सोबत जोडावयाची कागदपत्रेः- १० रुपयांचा कोर्ट फी स्टॅम्प, पदाधिकाऱ्यांचे ओळखपत्र (आधार कार्ड, मतदार ओळखपत्र), जागा मालकाचे ना हरकत पत्र, पत्त्याचा पुरावा म्हणून लाईट बिलाची प्रत, आधार कार्डची प्रत, ठरावाची प्रत, मागील वर्षाची परवानगी प्रत, मागील वर्षाचा हिशेब, परवानगी अर्ज, ठराव व ना हरकत प्रमाणपत्रावरील नाव सारखेच असणे आवश्यक, ना हरकत प्रमाणपत्रावर पूर्ण पत्ता आवश्यक.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा