माजी सैनिक,विर पत्नी यांनी युद्ध सन्मान योजनेसाठी सैनिक कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर दि.28 (जिमाका) – जिल्ह्यातील
सर्व माजी सैनिक, माजी सैनिक विधवा यांना युद्ध सम्मान योजनेंच्या अनुषंगाने
कळविण्यात येते की, ज्या माजी सैनिकाने 1965 किंवा 1971 च्या युद्धात प्रत्यक्ष
भाग घेतलेला असून ज्यांना समर सेवा स्टार आणि किंवा पूर्वी स्टार, पश्चिमी स्टार
मेडल मिळालेले आहे व त्यांना शासना तर्फे पेन्शन मिळत नाही अशा माजी सैनिकांना,
विधवांना एक रकमी अनुदान रुपये 15 लाख शासनातर्फे मिळण्यासाठी प्रस्तावित आहे.
जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, माजी सैनिक विधवा यांना
कळविण्यात येते की, ज्या माजी सैनिकांना माजी सैनिक विधवांना पेन्शन मिळत नाही व
माजी सैनिकाने 1965 किंवा 1971 च्या युद्धात प्रत्यक्ष भाग घेतला होता त्यांनी
आपआपल्या नोंद ठेवलेल्या कार्यालयास पाठवावी जेणेकरुन नोंद त्या माजी सैनिक, माजी
सैनिक विधवेचे नाव प्रस्तावात नोंदणी करुन पुढील योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.
अधिक माहिती साठी जिल्हा सैनिक कार्यालय येथे प्रत्यक्ष संबध साधावा.
00000
Comments
Post a Comment