ज्येष्ठ नागरिकांसाठी आज (दि.९) आरोग्य शिबीर

 छत्रपती संभाजीनगर दि.८ (जिमाका)- आयुष मंत्रालयाच्या सुचनेनुसार जिल्ह्यातील आयुष्मान आरोग्य मंदिर (आयुर्वेद व युनानी दवाखाने) येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी शुक्रवार दि.९ रोजी सकाळी साडेनू ते दुपारी २ वा. पर्यंत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जुना बाजार येथील युनानी दवाखान्यात हे शिबीर होणार असून तज्ज्ञ युनानी हकीम यांच्या मार्फत ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्याची तपासणी करून मोफत औषध व उपचार करण्यात येणार आहे. तसेच वय वर्षे पन्नासवरील सर्व रुग्णांच्या प्रयोगशाळेतील तपासण्या मोफत करण्यात येणार आहे. युनानी तज्ञ अल अमीन युनानी वैद्यकीय महाविद्यालय, मालेगाव येथील प्राचार्य  डॉ.शेख आबेद व डॉ शेख तनवीर अहमद वआयुर्वेद तज्ज्ञ डॉ.सतीश गवळी हे तपासणी करून उपचार करतील. या शिबिराचा ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ विशाल बेंद्रे, जिल्हा आयुष अधिकारी डॉ शेख शकील अहमद व डॉ सतीश गवळी यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा