विशेष लेखः- संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या योजना

 छत्रपती संभाजीनगर दि.7 (जिमाका)-संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित यांच्यामार्फत अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील (चांभार, ढोर, होलार व मोची इ.) यांचा आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या (एन.एस.एफ.डी.सी. नवी दिल्ली) विविध योजना राबविल्या जातात.

महामंडळाच्या जिल्हा कार्यालय मार्फत सन 2024-25 या आर्थिक वर्षा करीता सदरहू योजनांचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील (चांभार, ढोर, होलार व मोची इ.) इच्छुक अर्जदारांकडून कर्ज प्रस्ताव स्विकारण्यात येतात. त्यासाठी जाणून घेऊ या विविध योजनांची माहिती-

योजनांचे नाव व उद्दिष्ट  

1. 50 टक्के अनुदान योजना (उद्दिष्ट - 50)

2. बीज भांडवल योजना (उद्दिष्ट - 100)

3. मुदती कर्ज योजना (उद्दिष्ट - 63)

4. महिला समृद्धी योजना (उद्दिष्ट - 72)

5. लघुऋण वित्त योजना (उद्दिष्ट - 50)

6. महिला अधिकरीता योजना (उद्दिष्ट - 03)

7. शैक्षणिक कर्ज योजना (उद्दिष्ट - 20)

8. सुविधा ऋण योजना

9. उत्कर्ष ऋण योजना

पात्रतेचे निकष

या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा चर्मकार (चांभार, ढोर, होलार व मोची इ.) समाजातील असावा, तसेच अर्जदाराने यापूर्वी महामंडळाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदाराने आवश्यकतेनुसार कागदपत्रांची पुर्तता करुन आपले प्रस्ताव तीन प्रतीत स्वत: अर्जदाराने उपस्थित राहून मूळ कागदपत्रांसह दाखल करावेत. त्रयस्थ, मध्यस्थांमार्फत कर्ज प्रकरणांचे अर्ज देण्यात अथवा स्विकारण्यात येणार नाहीत.

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे

1.      अर्ज पूर्ण भरलेला

2.      जातीचा दाखला

3.      उत्पन्नाचा दाखला (रु.3 लक्षा पर्यंत)

4.    रहिवाशी दाखला

5.     रेशन कार्ड

6.      आधार कार्ड

7.     मतदान कार्ड

8.     पॅन कार्ड

9.      शैक्षणिक दाखला

10.  तीन फोटो कॉपीज

11.  लाभार्थ्याचा उद्योग आधार प्रमाणपत्र

12.  लाभर्थ्यांच्या सीबील क्रेडिट स्कोअर (500 च्या पुढे असावा)

13.  ज्या ठिकाणी व्यवसाय करावयाचा असेल त्या जागेचा पुरावा (जागेचे लाईट बिल, टॅक्स, भाडे पावती, भाडे करारनामा,जागा संमतीपत्र किंवा मालकी हक्काचा पुरावा इ.)

14.कागदपत्रे खरी असल्याबाबत लाभर्थ्यांच्या विनंती अर्ज व ज्या जागी व्यवसाय चालु आहे त्याच जागेचे प्रमाणित केलेले छायाचित्र

15. दोन सक्षम जामीनदार (नोकरदार किंवा मालमत्ताधारक, शेतकरी)

16.  सक्षम जामीनदारांपैकी नोकरदार असेल तर त्याच्या कार्यालयाचे लाभार्थ्यांने वसुलीचा भरणा केला नाही तर जामीनदाराच्या पगारातून कपात करुन भरणा करण्यात येईल असे कार्यालयाचे हमीपत्र

17. ग्रामपंचायत, नगरपालिका अथवा महानगरपालिका यांचे ना हरकत प्रमाणपत्र

18. व्यवसायसंबंधी तांत्रिक प्रमाणपत्र तसेच अनुभवाचा दाखला.

19.  आवश्यकतेनुसार प्रकल्प अहवाल (सी.ए.यांच्या सही व शिक्क्यासहीत)

20. खरेदी करावयाच्या मालमत्तेच्या सहित्याचे जी.एस.टी.क्रमांक असलेले दरपत्रक (कोटेशन)

21.  अर्जदाराचे वारसदाराच्या स्वाक्षरीसह नामांकन शपथपत्र (रु.100/- च्या स्टँम्पपेपरवर नोटरीसह)

22. अर्जदाराचे तसेच जामीनदारांचे विहीत नमुन्यातील शपथपत्रे (रु.100/- च्या स्टँम्पपेपरवर नोटरीसह)

23. अर्जदार विवाहीत स्त्री असल्याचे लग्नापूर्वीचे व लग्नानंतरच्या दोन्ही नावाची व्यक्ती ही एकच असल्याबाबत रु.100/- च्या स्टॅम्पपेपरवर नोटरीसह शपथपत्र.

24.                        लाभर्थ्यांच्या आधारकार्ड क्रमांक तसेच आधार संलग्न (Link) बँक खाते क्रमांक असलेल्या पासबूकची छायाकिंत प्रत.

वरील योजनांचे कर्ज प्रस्ताव दि. 8 ते 30 ऑगस्ट 2024 पर्यंत (सुटृटीचे दिवस वगळता) कार्यालयीन वेळेत जिल्हा कार्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, तळ मजला, शिवाजी हायस्कुल शेजारी, खोकडपुरा या ठिकाणी स्विकारले जातील. सर्व योजनांचे कोरे अर्ज वाटप याच ठिकाणी कार्यालयीन वेळेत होईल. इच्छुक अर्जदारांनी सोबत येताना मुळ आधार कार्ड घेऊन येणे आवश्यक राहील. जिल्ह्यतील समस्त चर्मकार समजा बांधवांनी (चांभार, ढोर, होलार व मोची इ.) महामंडळाच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक प्रविण के. जाहीर यांनी केले आहे.

सुचनाः- 50 टक्के अनुदान योजना व बीज भांडवल योजने अंतर्गत महामंडळात यापूर्वी दाखल केलेले सर्व जुने कर्ज प्रस्ताव रद्द समजण्यात येतील व  महामंडळाने जिल्ह्याकरीता निश्चित केलेल्या उद्दिष्टापेंक्षा जास्तीची प्रकरणे प्राप्त झाल्यास लाभार्थ्यांची निवड लॉटरी पद्धतीने केली जाईल,असे जिल्हा व्यवस्थापक प्रवीण जाहीर यांनी कळविले आहे.

-माहिती संकलन

जिल्हा माहिती कार्यालय, छत्रपती संभाजीनगर

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा