मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना; सहकारी संस्थांना मनुष्यबळ मागणी नोंदविण्याचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर दि.७ (जिमाका)- मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत २० पेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या सहकारी संस्थांनी आपल्याकडील मनुष्यबळ मागणी नोंदवावी,असे आवाहन जिल्हा उपनिबंधक डॉ. मुकेश बारहाते यांनी केले आहे.
राज्यातील
युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देवून त्यांची नोकरी मिळण्याची
क्षमता (Employability) वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरु
करण्यास मान्यता देण्यात आली आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि
मुख्यमंत्री जन-कल्याण कक्ष यांच्या मार्फत ही योजना राबवली जात आहे. या उपक्रमाअंतर्गत
तयार कलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून रोजगार इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करुन
देणारे उद्योजक जोडले जाणार आहेत. रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव
प्रशिक्षणातून मिळुन त्यांची क्षमतावाढ होईल तसेच उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी
आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे उपलब्ध करुन देण्यात येईल. तरी
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी सहकार विभागा अंतर्गत येणाऱ्या २० पेक्षा
जास्त कर्मचारी असणाऱ्या सर्व सहकारी संस्था पात्र आहेत. त्यानुषंगाने जिल्ह्यातील
जिल्हा बँक, सर्व सहकारी पतसंस्था, नागरी सहकारी बँका, कृषि उत्पन्न बाजार समिती यांनी
आपल्या आस्थापनेची नोंदणी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या
www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर प्राधान्याने करावी,असे आवाहन जिल्हा उपनिबंधक डॉ. मुकेश बारहाते यांनी केले आहे.
००००००
Comments
Post a Comment