राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना;आहरण संवितरण अधिकाऱ्यांना मार्गदर्शन

 


छत्रपती संभाजीनगर दि.७ (जिमाका)- वरिष्ठ कोषागार कार्यालय छत्रपती संभाजीनगर व प्रोटीन मुंबई यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन सभागृहात राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना याविषयी आहरण संवितरण अधिकाऱ्यांना एका कार्यशाळेच्या माध्यमातून मंगळवारी (दि.६) मार्गदर्शन करण्यात आले. अकिक देसाई यांनी या कार्यशाळेस मार्गदर्शन केले. सदस्य जागरुकता कार्यक्रम, स्तर २ कर रचनेचे फायदे, अंशतः निकास, पूर्णतः निकास इ. विविध विषयांवर अकिक देसाई यांनी मार्गदर्शन केले. वित्त विभागाच्या शासन निर्णय ३१ मार्च २०२३ च्या अनुषंगाने राष्त्रीय निवृत्ती वेतन योजनेबाबत करावयाच्या कार्यवाहीबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांनी सहकार्य केले. जिल्ह्यातील २५० हून अधिक अधिकारी कर्मचाऱ्यांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला. वरिष्ठ कोषागार अधिकारी शेखर कुलकर्णी यांनी आभार मानले.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा