बेपत्ता महिलेबाबत माहिती कळविण्याचे आवाहन

 


छत्रपती संभाजीनगर दि.23(जिमाका)-जवाहर नगर पोलीस स्टेशन हद्दीतून बेपत्ता झालेल्य्ला महिलेची माहिती कळविण्याचे आवाहन जवाहर नगर पोलीसांमार्फत करण्यात आले आहे. दि.14 ऑगस्ट 2024 रोजी येथे सविता अनिल सोनवणे (वय 40 वर्षे) रा.अरिहंत नगर जवाहर कॉलनी जैन मंदीराजवळ यांनी तक्रार दिली की, दि.12 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास सरीता स्वप्नील शिंदे (वय 23 वर्षे) ही MS-CIT क्लासला जात असे म्हणून घरातून निघून गेली. ती आज पावेतो घरी परत आली नाही. या तक्रारीवरुन जवाहर नगर पोलीस स्टेशन येथे मिसिंग नं.59/2024 प्रमाणे नोंद करण्यात आली आहे.

        बेपत्ता महिलेचे वर्णन याप्रमाणे-

            नाव :- सरीता स्वप्नील शिंदे वय 23 वर्षे व्यवसाय – गृहिणी रा.अरिहंत नगर जवाहर कॉलनी जैन मंदिराजवळ, रंग – गोरा, उंची - 5 फूट, बांधा – जाड, नाक सरळ, चेहरा गोल, डोळे काळे, केस काळे लांब, अंगात पिवळ्या  रंगाचा टॉप पांढऱ्या रंगाची सलवार, पायात चॉकलेटी रंगाचा शूज, डावे हातावर S अक्षर गोंदलेले, सोबत – सिम – 7558317881, 8208573756.

            वरील वर्णनाच्या महिलेबाबत काही माहिती मिळाल्यास जवाहर नगर पोलीस स्टेशन येथे फोन नं 0240-2240556, मो.नं.9823137725 वर माहिती कळवावी असे आवाहन पोलीस हेड कॉन्स्टेबल  सी.एस.पठाण यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा