महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचा उपक्रम; उद्या(दि.९) पासून दोन दिवसीय आयात-निर्यात प्रशिक्षण
छत्रपती संभाजीनगर दि.७ (जिमाका)- महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे दोन दिवसीय ‘आयात निर्यात प्रशिक्षण’ शुक्रवार दि.९ व शनिवार दि.१० रोजी आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणात निर्यात विषयक प्राथमिक माहिती, संधी, अर्थपुरवठा, प्रकार, प्रक्रिया, व्यवसाय सुरु करण्याबाबत माहिती तसेच शासकीय योजना, मालवाहतुक, जलवाहतुक, आयात प्रक्रिया, आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी, विविध देशांचे निकष, भारताचे अन्य देशांबरोबरचे व्यापार करार, भारताचे आयात निर्यात धोरण, कोविड नंतर आयात निर्यात व्यवसायाला असणाऱ्या संधी,आयात निर्यात व्यवसायातील संधी अशा विविध विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शक मार्गदर्शन करणार आहेत. इच्छुकांनी कार्यक्रम समन्वयक आशा कुरवाडे- ७८८८०७०४१९ तसेच जिल्हा प्रकल्प समन्वयक प्रतिभा निमकर यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन विभागीय अधिकारी डी.यु. थावरे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालय, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, अ-३८, रेल्वे स्टेशन एमआयडीसी एरिया, रेल्वे स्टेशन रोड, छत्रपती संभाजीनगर येथे संपर्क साधावा.
०००००
Comments
Post a Comment