भुजल पुनर्भरण जनजागृती रथ रवाना

 



            छत्रपती संभाजीनगर दि.१५(जिमाका)- भुजल पुनर्भरणाविषयी सोप्या भाषेत तांत्रिक माहिती देणाऱ्या भुजल पुनर्भरण जनजागृती रथास आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले. या रथात रेन वॉटर हार्वेस्टिंग, सिंचनाच्या आधुनिक पद्धती, जलसंधारणाचे साधे उपचार याविषयी सोप्या भाषेत माहिती देऊन जागृती करण्यात येत आहे. तसेच प्रतिकृतीही ठेवण्यात आल्या आहेत.

              भूजल पातळी वाढविण्यासाठी जिल्हाभरात लोकसहभागातून तसेच शासनाच्या विविध विभागा  मार्फत भूजल पुनर्भरण कार्यक्रम  राबविण्यात येत आहे. त्यामुळे भूजलाचे पुनर्भरण होऊन भूजल पातळीत वाढ होईल, भूजलाचे  पुनर्भरण, व्यवस्थापन होऊन त्या बद्दल समाजात जास्तीत जास्त  साक्षरता  होणे   काळाची गरज असल्याने  राष्ट्रीय जल विज्ञान प्रकल्प अंतर्गत वरिष्ठ  भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा छत्रपती संभाजीनगर च्या वतीने भूजल साक्षरता व पाण्याचा कार्यक्षम वापर विषयावर   जनजागृती करण्यात येत आहे.

            त्या अंतर्गत भूजल साक्षरता व पाण्याचा कार्यक्षम वापर ’या चित्ररथाचे आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते उदघाटन  करण्यात आले. उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे , वरिष्ठ भूवैज्ञानिक जीवन बेडवाल, सहायक भूवैज्ञानिक डॉ. कैलास आहेर,डॉ. शरद गायकवाड, तृप्ती मोरे, श्रीमती शुभांगी  कुंटे, सतीश मोरे,गोविंद गोंडपाटील,  चैत्राली वाघ, अकिब अबरार,  अतिश भिंगारे, आत्माराम हिवाळे, अमीर शेख,  स्वाती टेकाळे, शुभांगी चौधरी कुंदन गवळी, उमाकांत येवले, जिला खनिकर्म अधिकारी किशोर घोडके,किशोर चाटुफळे  आदी उपस्थित होते.

             भूजल पुनर्भरण आणि व्यवस्थापन बरोबरच  भूजल साक्षरता व पाण्याचा कार्यक्षम वापर होणे हि काळाची गरज असून भूजल साक्षरता व पाण्याचा कार्यक्षम वापर तसेच  भूजल पुनर्भरणाची चळवळही व्यापक प्रमाणात राबविणे गरजेचे आहे. त्यासाठी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा छत्रपती संभाजीनगर जनजागृती करत आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा