श्रावण महिना कालावधीत धुळे-सोलापूर महामार्गावरील अवजड वाहतुकीत बदल
छत्रपती संभाजीनगर दि.३(जिमाका)- श्रावण महिना कालावधीत खुलताबाद येथील भद्रा मारुती व वेरुळ येथील घ्रुष्णेश्वर देवस्थानांवर होणारी भाविकांची गर्दी, तसेच कावड यात्रेमुळे होणारी भाविकांची व त्यानिमित्ताने रहदारीची होणारी गर्दी लक्षात घेता धुळे सोलापूर महामार्गावरील वाहतुकीत बदल करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी निर्गमित केले आहेत. हे आदेश दि.४ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या काळावधीत प्रत्येक शुक्रवारी रात्री ८ वाजेपासून ते मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत लागू राहतील,असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
वाहतुकीतील
बदल याप्रमाणे–
फुलंब्री
कडून – कन्नड व धुळे कडे जाणारी सर्व जड वाहतूक – ही छत्रपती संभाजीनगर – शरनापूर
फाटा – माळीवाडा- वरझडी- कसाबखेडा- देवगाव रंगारी- शिऊर-तलवाडा घाट मार्ग चाळीसगाव
– धुळे कडे जाईल.
धुळे
– कन्नड कडून येणारी सर्व जड वाहतूक ही तलवाडा घाट- शिऊर- देवगाव रंगारी-
कसाबखेडा- वरझडी-माळीवाडा- छत्रपती संभाजीनगर मार्गे फुलंब्री कडे जाईल.
छत्रपती
संभाजीनगर खुलताबाद मार्गे चाळीसगाव – धुळे कडे जाणारी जड वाहतूक ही छत्रपती
संभाजीनगर – माळीवाडा- कसाबखेडा फाटा- देवगाव रंगारी – शिऊर- तलवाडा घाट मार्गे
चाळीसगाव कडे जाईल.
धुळे
– चाळीसगाव कडून खुलताबाद मार्गे छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी सर्व जड वाहतूक ही
तलवाडा घाट शिऊर – देवगाव रंगारी- कसाबखेडा फाटा- वरझडी- माळीवाडा मार्गे छत्रपती
संभाजीनगर कडे जाईल.
वेरुळ
– खुलताबाद कडून फुलंब्री कडे जाणारी वाहतुक ही वेरुळ – कसाबखेडा फाटा- माळीवाडा
मार्गे छत्रपती संभाजीनगर कडे जाईल.
00000
Comments
Post a Comment