निवृत्तीवेतन समाधान या उपक्रमाबाबत शुक्रवारी (दि.२३)कार्यशाळा
छत्रपती संभाजीनगर दि.१९(जिमाका)- निवृत्तीवेतन समाधान या नवीन उपक्रमाबाबत माहिती देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व आहरण संवितरण अधिकाऱ्यांची शुक्रवार दि.२३ रोजी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. महालेखापाल लेखा व हकदारी , नागपुर व वरिष्ठ कोषागार कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांच्याद्वारे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय येथे या कार्यशाळेचे आयोजन सकाळी ११ ते दुपारी दीड यावेळात करण्यात आले आहे.सर्व आहरण संवितरण अधिकाऱ्यांनी कार्यशाळेस उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे. त्यानंतर दुपारी अडीच ते साडेचार यावेळात आयोजित पेन्शन अदालत साठी संबंधितांनी आवश्यक त्या अभिलेख्यांसह उपस्थित रहावे असेही आवाहन करण्यात आले आहे. निवृत्तीवेतन , कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्या समन्वयाने सोडविण्यावर भर देण्यात येत असून त्यानुषंगाने या पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे,असे उपसंचालक वित्त तथा वरिष्ठ कोषागार अधिकारी शेखर कुलकर्णी यांनी कळविले आहे.
०००००
Comments
Post a Comment