मुख्यमंत्रीःमाझी लाडकी बहिण योजना;५ लाख २६ हजार ५१२ बहीणींच्या अर्जांना मान्यता

 छत्रपती संभाजीनगर दि.८ (जिमाका)- महिला सक्षमीकरणासाठी राबविण्यात येत असलेली शासनाची महत्त्वाकांक्षी योजना ‘मुख्यमंत्रीःमाझी लाडकी बहीण’ साठी जिल्ह्यातील ५ लाख २६ हजार ५१२ बहिणींचे अर्ज मान्य झाले आहेत, अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुवर्णा जाधव यांनी दिली आहे.

यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, ‘मुख्यमंत्रीः माझी लाडकी बहिण योजना’ जिल्ह्यात राबविण्यात येत असून महिलांच्या नाव नोंदणीसाठी जिल्ह्यात प्रत्येक गावात व्यवस्था करण्यात आली. जिल्ह्यात ५ लाख ४१ हजार्ज़ ५४२ महिलांनी या योजनेसाठी अर्ज दाखल केले होते. या अर्जांची छाननी होऊन आतापर्यंत ५ लाख २६ हजार ५१२ जणींच्या अर्जांनां मान्यता देण्यात आली आहे. १० हजार ४४ जणींच्या अर्जांवर निर्णय झालेला नाही,असे स्पष्ट करण्यात आले आहे. प्रलंबित अर्जांबाबत अशा बहिणींकडून राहिलेल्या त्रुटी वा अर्ज भरण्यात काही चुका झाल्या असल्यास त्यांना पाचारण करुन त्याची पूर्तता करण्यात येईल त्यानंतर अंतिम निर्णय होईल, असे श्रीमती जाधव यांनी सांगितले.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा