आजी व माजी सैनिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी जिल्ह्यातील सर्व तालुका स्तरावर बैठकीचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर दि.27 (जिमाका) – जिल्ह्यातील
आजी व माजी सैनिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी तालुका पातळीवर तहसिलदार यांच्या
अध्यक्षतेखाली संबंधित गावाच्या तहसिल कार्यालयात पुढीलप्रमाणे बैठक अयोजित
करण्यात आलेली आहे.
दि.17 सप्टेंबर ता.वैजापूर, दि.18 सप्टेंबर ता.गंगापूर,
दि.19 सप्टेंबर ता.पैठण दि.20 सप्टेंबर ता. खुलताबाद दि.23 सप्टेंबर ता.फुलंब्री,
दि.24 सप्टेंबर ता.सिल्लोड, दि.25 सप्टेंबर ता.कन्नड, दि.26 सप्टेंबर ता.सोयगाव,
दि.27 सप्टेंबर ता.छत्रपती संभाजीनगर या सर्व तालुकास्तरीय बैठक वेळ दु.12 वा.
तहसिल कार्यालय किंवा पंचायत समिती सभागृहाच्या ठिकाणी बैठक होईल. तालुक्यातील आजी
व माजी सैनिकांना या कळविण्यात येते की, त्यांनी या बैठकीस वरीलप्रमाणे बैठकीच्या दिवशी
वेळेवर तहसिल कार्यालय, पंचायत समिती सभागृहाच्या ठिकाणी येथे हजर रहावे असे आवाहन
जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे. अधिक माहिती साठी दूरध्वनी क्रमांक
0240- 2370313 वर संपर्क साधवा.
00000
Comments
Post a Comment