उद्योजकता विकास प्रशिक्षण; दि.१३ रोजी
छत्रपती संभाजीनगर दि.८ (जिमाका)- येथील महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे एक महिना कालावधीचा उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम मंगळवार दि.१३ पासून आयोजित करण्यात आला आहे. इच्छुकांनी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, (एमसीईडी) जिल्हा कार्यालय ,अ-३८, एमआयडीसी रेल्वे स्टेशन एरिया, देवगिरी कॉलेज जवळ,छ.संभाजीनगर येथे संपर्क साधावा,असे आवाहन विभागीय अधिकारी डी.यु. थावरे यांनी केले आहे.
उद्योजकता विकास
प्रशिक्षण कार्यक्रमाचा मुख्य उद्देश उद्योजकते त आवड असणाऱ्यांना त्यांच्या क्षेत्रातील
यशस्वी उद्योजक घडविणे हा होय. या कार्यक्रमात
स्टार्टअप व स्टॅंडअप धोरण, उद्योजकीय गुणसंपदा,
उद्योजकीय व्यवस्थापन, उद्योग उभारणीचे विविध टप्पे, विविध क्षेत्रातील उद्योगसंधी
शोध व निवड, शासकीय कर्ज योजनांची माहिती, महिला उद्योजकांसाठी विशेष धोरण, यशस्वी
उद्योजकांचे अनुभव, विविध उद्योगास भेटी, उद्योजकीय व्यक्तीमत्व विकास, प्रकल्प अहवाल,
बाजारपेठ पाहणी तंत्र , उद्योग नोंदणी, कर, कायदे व परवाने. वित्तीय व्यवस्थापन, उद्योग
वाढी साठी मार्केटिंग कौशल्य डिजिटल मार्केटिंग, सिद्धीप्रेरणा प्रशिक्षण इत्यादी अनेक
विषयांवर सविस्तर माहिती त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ देतील.
या प्रशिक्षण कार्यक्रमात
सहभागी होणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना शासकीय
योजनांची माहिती होईल व लाभ घेता येईल. डिजिटल मार्केटींग कौशल्याच्या सहाय्याने आपल्या
उत्पादनाची विक्री वाढविता येईल. मार्केट सर्व्हेच्या माध्यमातून उद्योग निवडण्यास
मदत होईल, उद्योगासाठी लागणारे विविध शासकीय परवाने व मानांकने (जसे उद्यम रेजिस्ट्रेशन)
याची माहिती होईल, यशस्वी प्रशिक्षणानंतर कर्ज प्रकरणाकरिता आवश्यक असलेले ई.डी.पी. प्रमाणपत्र मिळेल, उद्योजक मासिक पुढील एक वर्ष मोफत घरपोच मिळेल,प्रशिक्षणा नंतर पुढील
३ वर्ष आपला उद्योग सुरु होण्याच्या दृष्टीने सतत पाठपुरावा राहील.
प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांनी अधिक माहितीकरिता
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, (एमसीईडी) जिल्हा कार्यालय,अ-३८, एमआयडीसी रेल्वे
स्टेशन एरिया, देवगिरी कॉलेज जवळ छत्रपतीसंभाजीनगर येथे कार्यक्रम समन्वयक वैशाली डोंगरे-
9325150557 किंवा प्रकल्प अधिकारी भारती सोसे-पांढरकर- 9403683173 येथे त्वरित संपर्क
साधावा,असे आवाहन विभागीय अधिकारी डी.यू.थावरे यांनी केले आहे.
००००००
Comments
Post a Comment