स्वातंत्र्यदिनाचा मुख्य शासकीय समारंभ विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात

 छत्रपती संभाजीनगर दि.१२ (जिमाका)- भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय सोहळा  गुरुवार दि.१५ रोजी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात सकाळी ९ वा. ५ मिनीटांनी होणार आहे. ध्वजारोहण अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. या सोहळ्या स्वातंत्र्य सैनिक, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक, पत्रकार विद्यार्थी विद्यार्थिनींनी उपस्थित रहावे असे आवाहन विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी  केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा