लोकशाही दिनी २१ अर्ज प्राप्त
छत्रपती संभाजीनगर दि.५ (जिमाका)- दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय लोकशाही दिवस आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला. यावेळी २१ जणांचे अर्ज प्राप्त झाले.विभागनिहाय प्राप्त अर्ज याप्रमाणे- कृषी विभाग-४, महसूल विभाग-१, पुरवठा विभाग-३, इतर निवेदने-१३ असे एकूण २१ अर्ज प्राप्त झाले. हे अर्ज संबंधित विभागांकडे कार्यवाहीसाठी वर्ग करण्यात आले आहेत.
०००००
Comments
Post a Comment