ज्येष्ठांच्या आरोग्य शिबिरात ११० जणांची तपासणी

 



छत्रपती संभाजीनगर दि.९(जिमाका)- राष्ट्रीय आयुष अभियानाअंतर्गत युनानी दवाखाना जूना बाजारयेथे अंतर्गत वार्धक्यजन्य आजार निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. ज्येष्ठांसाठी आयोजित या शिबिरात ११० जणांची तपासणी करण्यात आली.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ विशाल बेंद्रे व जिल्हा आयुष अधिकारी डॉ शेख शकील यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले. तालुका आरोग्य अधिकारी  डॉ. सावरगावकर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. शेख तनवीर अहमद अध्यक्ष, युनुस फजलानी, प्रा. डॉ अफशां या युनानी तज्ज्ञांनी  रूग्णतपासणी व उपचार केले. योग तज्ञ श्रीमती कुलकर्णी  यांनी योग व आयुर्वेद या विषयावर मार्गदर्शन केले. ज्येष्ठांना खुर्चीत बसून करता येण्यासारखे योगा व्यायाम, प्राणायाम व ध्यान याचे प्रात्यक्षिकही करुन घेण्यात आले. जिल्हा आयुष अधिकारी डॉ शेख शकील यांनी राष्ट्रीय आयुष मिशन, वृद्धांसाठी नियमित तपासणीचे महत्व व वृद्धावस्थेत घ्यावयाची काळजी याबाबत माहिती दिली. शिबिरात रक्ताच्या  सीबिसि,शुगर, कोलेस्ट्रॉल, थायरॉइड, लिव्हर संबंधीत, किडनी संबंधित चाचण्या मोफत करण्यात आल्या,      शिबीरामध्ये ११० रूग्णांची तपासणी तर ३६ रुग्णांच्या प्रयोगशालेय चाचण्या करण्यात आल्या. आयोजनासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सावरगावकर, युनानी दवाखान्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सतीश गवळी, एच एल एल (महा लॅब) चे जिल्हा समन्वयक साजिद कुरणे व अनिल थोरात यांनी परिश्रम घेतले.

०००००

 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा