शासकीय कर्मचाऱ्यांचा माहितीकोष; माहिती पाठविण्याचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर दि२१(जिमाका) - अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई या कार्यालयाकडून महाराष्ट शासनाच्या सेवेतील सर्व कर्मचाऱ्यांचा सर्वकष माहितीकोष दरवर्षी अद्ययावत करण्यात येतो. ही कार्यवाही हाती घेण्यात आली आहे. या माहिती कोषासाठी सर्व आहरण संवितरण अधिकारी यांनी आपल्या आस्थापनेतील कर्मचाऱ्यांची माहिती वेळेत पाठवावी असे आवाहन जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे उपसंचालक एस. व्ही. मिसाळ यांनी केले आहे.
शासकीय कर्मचाऱ्यांच्या माहितीकोषामध्ये नियमित आस्थापनेवरील कर्मचारी
व नियमितेतर आस्थापनेवरील कर्मचारी (कार्यव्ययी आस्थापनेवरील, रोजंदारीवरील, अंशकालीन,
मानसेवी इ.) तसेच तदर्थ तत्वावर नेमणुका करण्यात आलेले कर्मचारी अशा सर्व प्रकारच्या
कर्मचाऱ्यांची माहिती दि.१ जुलै २०२४ या संदर्भ दिनांकास अनुसरुन गोळा करण्यात येणार
आहे.
महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाकडून सर्वकष माहितीकोष-२०२४ बाबत शासन
परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. जिल्हास्तरावर संबंधित जिल्हा सांख्यिकी कार्यालय
शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष तयार करण्याची कार्यवाही करणार आहे. अर्थ व
सांख्यिकी संचालनालयाकडून शासकीय कर्मचारी सर्वकष माहिती कोष–२०२४ नोंदणी करण्यासाठी ऑनलाईन संगणकीय आज्ञावली,
फ्लोचार्ट, शासन परिपत्रक https://mahasdb.maharashtra.
०००००
Comments
Post a Comment