डॉ.झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना; प्रस्ताव मागविले
छत्रपती
संभाजीनगर दि.९ (जिमाका)- अल्पसंख्याक विकास विभागातर्फे डॉ.झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना
राबविण्यात येते. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी या योजनेंतर्गत अनुदान मिळवू
इच्छिणाऱ्या मदरसांनी दि.१५ सप्टेंबर पर्यंत आपले प्रस्ताव सादर करावे असे आवाहन
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे. प्रस्ताव दाखल करण्याकरीता योजनेचा शासन निर्णय व आवश्यक कागदपत्रांची यादी https://mdd.maharashtra.
पात्रतेच्या अटी व शर्ती याप्रमाणे-
१. मदरसा चालविणारी संस्था राज्यातील
वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत झालेली असावी.
२. मदरसांमध्ये शिक्षण घेणारे सर्व
विद्यार्थी हे नियमित शिक्षण घेण्याकरीता नजिकच्या शाळेत प्रवेशित तसेच ज्या
मदरशामध्ये कंत्राटी पद्धतीने नेमण्यात आलेल्या शिक्षकांद्वारे गणित व विज्ञान हे
विषय शिकविले जातात अशा मदरशांना प्राधान्य दिले जाईल व तसे जिल्हा शिक्षणधिकारी
यांनी प्रमाणीत करणे आवश्यक राहील.
३. एका इमारतीत एकच मदरसा असावा.
अटी व शर्ती
नुसार पात्र मदरसा चालकांनी मदरसांचे परिपूर्ण प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालय येथे
दि.१५ सप्टेंबर पर्यंत सादर करावे, विहित मुदतीनंतर प्राप्त झालेले प्रस्ताव स्विकारले
जाणार नाहीत याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे.
०००००
Comments
Post a Comment