आपत्ती व्यवस्थापन जनजागृती वाहनास पालकमंत्र्यांच्या हस्ते हिरवी झेंडी
छत्रपती संभाजीनगर दि.३(जिमाका)- राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन जनजागृती वाहनांना आज राज्याचे पणन वअल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले.
या जनजागृती मोहिमेचा शुभारंभ पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या
हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मनपा आयुक्त तथा प्रशासक जी.
श्रीकांत, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांची
उपस्थिती होती. या मोहिमेत प्रत्येक तालुक्यात दोन याप्रमाणे एकूण २० रोड शो व २० पथनाट्य
सादर होणार आहेत. दि.७ पर्यंत ही मोहिम सुरु राहणार आहे.
००००००
Comments
Post a Comment