अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती; ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात
छत्रपती संभाजीनगर दि.९(जिमाका) - सहायक आयुक्त, समाज कल्याण या कार्यालयामार्फत भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील प्रवेशित व भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती व इतर ऑनलाईन योजनेसाठी पात्र अनुसुचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अर्ज करणेसाठी महाडिबीटी प्रणाली दि.२५ पासून सुरुवात झाली आहे. तरी जिल्ह्यातील सर्व शासकीय अनुदानित, विनाअनुदानित, शासकीय, व्यावसायिक, बिगर व्यावसायिक महाविद्यालयातील प्राचार्यांनी या योजनांची माहिती दर्शविणारा व अर्ज करण्याच्या अंतिम तारखेची नोंद असलेला फलक महाविद्यालयाच्या दर्शनी भागावर लावावा. तसेच आपल्या महाविद्यालयातील प्रवेशित सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे अर्ज दि.३० मार्च २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने भरुन घेण्याची कार्यवाही करावी असे आवाहन सहायक आयुक्त समाजकल्याण यांनी केले आहे.
०००००
Comments
Post a Comment