उद्योगमंत्री उदय सामंत यांचा जिल्हा दौरा
छत्रपती संभाजीनगर दि.११ (जिमाका) – राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे सोमवार दि.१२ रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
सोमवार, दि. १२ रोजी सकाळी ९ वा. विमानाने छत्रपती संभाजीनगर विमानतळ,
चिकलठाणा येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृह, छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण.
सकाळी साडेनऊ वा. सुभेदारी शासकीय विश्रामगृह, येथे आगमन व राखीव. सकाळी साडेदहा
वा. छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यातील उद्योग विभागाअंतर्गत विविध
विषयांसंदर्भात आढावा. स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय. दुपारी १२ वा. मराठवाडा
विभाग: छत्रपती संभाजीनगर महायुती समन्वयक पदाधिकारी बैठक व विभागीय संवाद यात्रा,
स्थळ-संत एकनाथ सभागृह, दुपारी अडीच वा. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात नवीन
गुंतवणूक केल्याबद्दल मसिआ व उद्योजकांतर्फे गुंतवणुकदारांचा सन्मान समारंभ, स्थळ-
रत्नप्रभा बाळासाहेब पवार सभागृह, मसिआ, चिकलठाणा औद्योगिक क्षेत्र, चिकलठाणा,
दुपारी ४ वा. पत्रपरिषद, स्थळ- मसिआ बोर्ड रूम, चिकलठाणा औद्योगिक क्षेत्र,
छत्रपती संभाजीनगर. सायं.५ वा. छत्रपती संभाजीनगर विमानतळ, चिकलठाणा येथे आगमन व
विमानाने नाशिककडे प्रयाण.
Comments
Post a Comment