हर घर तिरंगा अभियान: शाळा, महाविद्यालयांनी सहभाग द्यावा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 





छत्रपती संभाजीनगर दि.९(जिमाका)- ‘हर घर तिरंगा’ हे अभियान दि.१३ ते १५ ऑगस्ट या  कालावधीत राबविण्यात येणार असून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीचे संस्कार रुजविण्यासाठी सर्व शाळा महाविद्यालयांनी या कार्यक्रमात सहभाग द्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे.

            जिल्हा नियोजन सभागृहात आज महाविद्यालयांचे प्राचार्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन प्रभोदय मुळे, प्रशासकीय अधिकारी उच्च शिक्षण वनिता सांजेकर तसेच सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य आदी सहभागी झाले होते.

            जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, घरोघरी तिरंगा हे  अभियान सर्व तालुके आणि गावांमध्ये हे अभियान विविध उपक्रम, नाविन्यपूर्ण संकल्पनासह राबवावयाचे आहे. त्यात प्रामुख्याने  आपल्या घरांवर तसेच, शासकीय, निमशासकीय कार्यालये, खासगी आस्थापना, संस्था, संघटना कार्यालय इमारतींवर तिरंगा ध्वज लावता येणार आहे. या अभियानात सर्वांना सक्रिय सहभागी होता येणार आहे. तसेच हे अभियान लोकाभिमुख करण्यासाठी महाविद्यालयांनी प्रयत्न करावे. या अभियानात तिरंगा रॅली, तिरंगा यात्रा, तिरंगा मॅरेथॉन, तिरंगा कॉन्सर्ट, तिरंगा कॅनव्हास, तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा सेल्फी, तिरंगा ट्रीब्यूट असे विविध उपक्रम राबविण्यात येणार त्यात महाविद्यालये व महाविद्याल्यातील युवक युवतींनी  सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले. प्रत्येक महाविद्यालयामध्ये युवासंवाद, मतदार नोंदणी व जाणीवजागृती अशा विविध उपक्रमाच्या माध्यमातून हरघर तिरंगा कार्यक्रम विविध  प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करून साजरा करावा. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयांमध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रमार्फत विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांची माहिती, मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासन सदैव तत्पर असल्याचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगीतले .

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा