जिल्हाधिकारी कार्यालयात सद्भावना प्रतिज्ञा
छत्रपती संभाजीनगर दि.२०(जिमाका)- माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात सद्भावना प्रतिज्ञा घेण्यात आली. प्रारंभी राजीव गांधी यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले. तहसिलदार रुपा चित्रक यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांनी सद्भावना प्रतिज्ञेचे सामुहिक वाचन केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.
०००००
Comments
Post a Comment