मुख्यमंत्री वयोश्री योजना व मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजनेचा लाभ मिळण्यासाठी विशेष आरोग्य शिबिरांत ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी

 









छत्रपती संभाजीनगर दि.२३(जिमाका)- मुख्यमंत्री वयोश्री योजना व मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजना या योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी असून या योजनांचा लाभ घेणे सोपे व्हावे यासाठी जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्रांवर दि.२३ व २४ रोजी आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून आजपासून जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांवर तपासणी करुन ज्येष्ठ नागरिकांना वैद्यकीय प्रमाणपत्र देणे सुरु झाले आहे. ही शिबिरे उद्या (दि.२४) सुरु राहणार असून ज्येष्ठ नागरिकांनी आपली आरोग्य तपासणी करुन घ्यावी,असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे.

            ज्येष्ठ नागरिक हे लाभार्थी असलेल्या वयोश्री योजना व तीर्थदर्शन योजना या योजनांचा लाभ देण्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा ही गावपातळीवर करण्यात आली आहे. तसेच या योजनांचा लाभ घेण्यासाठी वैद्यकीय तपासणी करणे ही पूर्वअट आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामिण रुग्णालये येथे ज्येष्ठ नागरिकांच्या वैद्यकीय तपासणीसाठी विशेष शिबिरे आयोजित करुन त्यांना वैद्यकीय दृष्ट्या सक्षम असल्याचे प्रमाणपत्र देण्यात यावे असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले होते. त्यास अनुसरुन आज (दि.२३) व उद्या (दि.२४) जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्रांवर ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यासाठी विशेष शिबिरे लावण्यात आली आहेत. या शिबिरांचा लाभ घेऊन ज्येष्ठ नागरिकांनी आपली आरोग्य तपासणी करुन वैद्यकीय प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे,असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे.

            ०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा