जिल्ह्यातील आरोग्य केंद्रात मातांमध्ये स्तनपानविषयक जनजागृती
छत्रपती संभाजीनगर दि.८ (जिमाका)- जागतिक स्तनपान सप्ताह जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व आरोग्य उपकेंद्रांमध्ये दि.१ ते ७ ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह साजरा करण्यात आला. यानिमित्त स्तनदा मातांमध्ये स्तनपानविषयक जनजागृती करुन त्यांचे शंकानिरसन करण्यात आले.
स्तनदा
मातांकरीता सुरक्षित वातावरण निर्मिती करणे, बालमृत्यू कमी करणे, पोषण सुधारणा आणि
बालपणीच्या प्रारंभिक विकासामध्ये निव्वळ स्तनपानाच्या भूमिकेवर भर देण्यासाठी जागतिक
स्तनपान सप्ताह आयोजित केला जातो. या वर्षीच्या जागतिक स्तनपान सप्ताहासाठी ‘आई आणि
बाळा मधील अंतर कमी करु या स्तनपानाला समर्थन देऊ या’, ही संकल्पना निश्चित करण्यात
आली होती. माता तिच्या बाळाला सुरक्षितपणे आणि आत्मविश्वासाने स्तनपान करू शकेल अशा
प्रकारची सुरक्षित आणि आश्वासक वातावरण निर्मिती करण्याबाबत यानिमित्ताने जनजागुती
करण्यात आली. जिल्हयातील सर्व प्रसुती केंद्रांमध्ये जन्मानंतर १ तासाच्या आत बाळाला
स्तनपान देणे आणि मातांना स्तनपानासाठी पुरेसा पाठिंबा देण्याकरीता सर्व प्रसूती केंद्रांवर
लक्ष केंद्रित करण्यात आले. तसेच समुदाय आणि संस्थास्तरावर कार्य करणाऱ्या आरोग्य सेवा
प्रदात्यांमार्फत बाळाला पहिले ६ महिने फक्त स्तनपान व त्याचे महत्व आणि ६ महिन्यानंतर
ते २ वर्षे वयापर्यंत किंवा त्यानंतरही पुरक आहारासोबत स्तनपान सुरु ठेवणे या विषयी
माहिती देण्यात आली, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विशाल बेंदे यांनी कळविले आहे.
०००००

Comments
Post a Comment