जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचा पाथ्री प्रशालेतील मुलींशी संवाद
छत्रपती
संभाजीनगर दि. २८ (जिमाका)- प्रत्येक शाळा-
महाविद्यालयात मुलींना शिक्षणासाठी निर्भय आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी
त्यांच्याशी वेळोवेळी संवाद आवश्यक आहे. यासाठी
शिक्षक व सखी सावित्री समिती सदस्यांनी संवाद साधावा असे निर्देश जिल्हाधिकारी
दिलीप स्वामी दिले असून आज त्यांनी स्वतः फुलंब्री तालुक्यातील पाथ्री येथील राजश्री
शाहू विद्यालयातील विद्यार्थ्यांनीसोबत संवाद साधला.
या दरम्यान मुलींना शाळेतील वातावरण
सुरक्षित व निर्भय वाटावे यासाठी संवादातून समुपदेशन करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
यांनी सांगीतले.
संवादा दरम्यान त्यांच्या मनातील भीती
दूर करून आत्मविश्वास पूर्ण आपल्या क्षेत्राची निवड कशी करायची याबाबत मार्गदर्शन
केले. मुलींनी आय. ए .एस, आय .पी .एस, डॉक्टर, सैन्यदल तसेच विविध
क्षेत्रांमध्ये करिअर करण्याचे मनोगत सांगितले . मेहनतीने आणि प्रयत्नाने प्रत्येक
क्षेत्रामध्ये यश संपादन करता येते यासाठी अभ्यास आणि आत्मविश्वासपूर्ण प्रयत्न करणे
गरजेचे असल्याचे श्री. स्वामी यांनी सांगितले. मुलींना शाळेमध्ये मिळणाऱ्या भौतिक सुविधा,
सुरक्षितता व स्वसंरक्षणाचे विविध प्रात्यक्षिक याबाबत मुलींशी संवाद साधून त्यांना
मार्गदर्शन केले.
प्रत्येक मुलीने आपल्या आई-वडिलांसोबत तसेच शाळेतील शिक्षकांसोबत संवाद साधावा.
मुलींनी येणाऱ्या अडचणी संवाद साधून दूर कराव्यात व त्याविषयी आपल्या आई
वडील ,नातेवाईक, शिक्षक, यांना अवगत करावे.
फुलंब्री तहसिलदार कृष्णा कानगुले,गटशिक्षण
अधिकारी क्रांती धसवाडीकर ,शिक्षण विस्तार अधिकारी राजेश महाजन, मुख्याध्यापक श्री
अरुण टेकाळे ,प्राचार्य गजानन सानप, प्राचार्य कैलास इंगळे यांच्यासह शाळेतील विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
00000







Comments
Post a Comment