मुख्यमंत्रीःमाझी लाडकी बहीण योजना :'रक्षाबंधनाची ओवाळणी मिळाली...आनंदीआनंद झाला'! बहिणींच्या खात्यावर ३ हजार रुपये जमा

             छत्रपती संभाजीनगर दि.१६(जिमाका)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शब्द दिल्याप्रमाणे माझ्या खात्यात तीन हजार रुपये जमा झाले. रक्षाबंधना आधीच आमच्या या लाडक्या भावाकडून ओवाळणी मिळाली, खूप आनंद झाला!, हे उद्गार आहेत जिल्ह्यातील बहिणींचे.

            जिल्ह्यात मुख्यमंत्रीः माझी लाडकी बहीण योजनेसाठी एकूण ५ लाख ४१ हजार ७१६ अर्ज आले होते. त्यापैकी ५ लाख ३३ हजार ७८३ लाभार्थी पात्र ठरल्या आहेत. या पात्र लाभार्थी महिलांच्या बॅंक खात्यात दोन महिन्यांचे तीन हजार रुपये काल पासूनच जमा होत होते. पैसे जमा झाल्याचे संदेश मोबाईल वर पाहुन महिलांच्या आनंदाला पारावार रहात नव्हता. यानिमित्ताने बिडकीत ता. पैठण या गावातील महिलांशी संपर्क साधला असता त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया फार बोलक्या होत्या. छाया नरवडे,  सुशिला पगारे, सुशिला टाकेकर, शोभा वाघ, शाहीन शेख, शकिला सैय्यद, वंदना भालेराव, मुमताज शेख, मीरा मुरजारे, प्रियंका जोशी, ज्योती रोठे या काही बहिणींचे मनोगत जाणून घेतले असता; त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आपल्या हक्काचे पैसे मिळाल्याचा आनंद या महिलांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. आपल्या भावाने पाठवलेली ही रक्षाबंधनाची ओवाळणी म्हणून हा पैसा निव्वळ  योजनेचा लाभ न राहता त्याला एक वेगळे भावनिक परिमाण लाभले आहे,असे या बहिणींच्या मनोगतातून स्पष्ट होते. कुणाला आपल्या संसाराला हातभार लाभल्याचे अप्रुप होते तर कुणाला आपल्या हक्काचे पैसे मिळाल्याचा आनंद होता. भावाने दिलेला शब्द पाळला अशीही भावना व्यक्त केली. एकंदर महिलांच्या जीवनात या योजनेमुळे बदल होऊन त्यांच्यात आत्मविश्वास बळावलेला दिसला.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा