इतर मागास वर्ग विद्यार्थ्यांच्या वसतीगृहाचे उद्घाटन: राज्यात ७२ वसतीगृहांची उभारणी- मंत्री अतुल सावे
छत्रपती संभाजीनगर दि.१६(जिमाका)-इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने राज्यात ७२ वसतीगृहांची उभारणी करण्यात येणार आहे. त्यामुळे इतर मागास घटकातील विद्यार्थी विद्यार्थिनींच्या शिक्षणाची मोठी सोय होणार आहे,असे प्रतिपादन राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी आज येथे केले.
श्री.सावे
यांच्या हस्ते आज इतर मागास वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठीच्या पहिल्या वसतीगृहाचे वेदांत
नगर येथे उद्घाटन करण्यात आले. जलील शेख, पी.जी.वाबळे, चंद्रकांत हिवराळे, नरेंद्र
तिवारी, लक्ष्मण हिवराळे यांच्या सह विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि विद्यार्थी तसेच
पालकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
ग्रामीण
भागातील मुला मुलींची शहरात शिक्षण घेत असताना राहण्याची अडचण निर्माण होवू नये यासाठी
राज्य सरकारच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने राज्यातील ३६ जिल्ह्यात प्रत्येकी
२ असे ७२ वसतीगृह तयार करण्यात येत आहे. यात १०० मुले आणि १०० मुली यांच्या निवासाची
क्षमता आहे. सर्व सुविधा या वसतीगृहात आहेत. वसतीगृहात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना
शैक्षणिक साहित्य, विविध भत्ते, ग्रंथालय अशा विविध सुविधा पुरवण्यात येणार आहेत.
श्री. सावे म्हणाले की, विमुक्त जाती आणि भटक्या जमाती, इतर
मागास वर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक
विकास करण्यासाठी राज्य सरकार कटीबद्ध असून याकरिता शासन भरघोस निधी उपलब्ध करून देत
आहे. ग्रामीण भागातून शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या मुला मुलींची निवासाची व्यवस्था करण्यात
आली असल्याने यामुळे त्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये याचा निश्चितच खूप मोठा उपयोग होईल, असेही त्यांनी सांगितले. या वसतीगृहात ज्यास्तीत
जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा. ज्यांना प्रवेश मिळणार नाही अशांना सावित्री
बाई फुले आधार योजना आणि स्वयंम योजने च्या माध्यमातून त्यांना आर्थिक मदत मिळणार आहे,असेही
श्री.सावे यांनी सांगितले.
०००००






Comments
Post a Comment